नारोशंकराची घंटा : ही पुढची सोय आहे..! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Get together

नारोशंकराची घंटा : ही पुढची सोय आहे..!

पार्टी, गेट-टुगेदर म्‍हटले की उत्‍साह, ऊर्जा अन्‌ मद्याचा प्‍याला अन्‌ सोबत सुमधुर संगीत असे चित्र डोळ्यासमोर उभे राहाते. अपेक्षेप्रमाणे एका गेट-टुगेदरमध्ये असाच भारदस्‍त माहोल बघायला मिळाला. (naroshankarachi ghanta sakal special liquor drinking party nashik news)

हळूहळू सर्व सहभागी येत होते. त्‍यापैकी एक समूह आधीच येऊन टेबलवर ठाण मांडून बसला होता. सर्व येतील व पार्टी सुरु होईल, याची प्रतीक्षा होती. तोपर्यंत काय करायचे, तर गाणी लावण्यात आली. संयोजकाने मस्‍तपैकी इंग्रजीमधील गाणी लावली.

आता उपस्‍थितांना गाणी काही पचनी पडे ना..एक गाणं वाजलं, दुसरं वाजल. एकामागे एक इंग्रजी गाणी सुरुच होती. त्‍यावर राहावले न गेल्‍याने समूहापैकी एक जण म्‍हणालाच, आपले आपले हिंदी, मराठी गाणी लावा राव.. हे काही समजं ना.. आता यावर बाजू सावरायची म्‍हणजे तेथेच उपस्‍थित संयोजक म्‍हणाला, ‘कसे आहे, आता पार्टी सुरु होईल.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

प्‍याला भरला जाईल. मग वातावरण निर्मिती होऊन उपस्‍थित सर्वच आपल्‍या इंग्रजी भाषेत संभाषण सुरु करतील. म्‍हणूनच ही पुढची सोय आहे.

आता इंग्रजी संभाषण म्‍हटले तर गाणी पण इंग्रजी ऐकायला पाहिजे ना..’ असे म्‍हणताच उपस्‍थितांमध्ये हास्‍य कल्‍लोळ माजला. अन्‌ इंग्रजी गाण्यांकडे दुर्लक्ष करत उपस्‍थितांकडून अन्‍य विषयांवर चर्चा सुरु ठेवण्यात आली.