
नारोशंकराची घंटा : अन मॅडम जमिनीवर आल्या...
काही व्यक्तींना स्वत:ची स्तुती करायला फार आवडतं. दुसऱ्यांनी त्यांची वाहऽऽवा केली तर विचारायलाच नको. यांच्या आनंदाला पारावारच उरत नाही. त्यात महिला म्हटल्यावर त्यांच्या कार्याचे तोंडभरुन कौतुक सर्वत्र होत असेल तर त्या कायम हवेतच तरंगतात. (Naroshankarachi ghanta sakal special madam came to ground nashik news)
हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!
तर झाले असे, की एका नवशिख्या महिलेला दोन दिवसांसाठी मुख्य अधिकाऱ्यांचा चार्ज दिलेला असतो. त्यामुळे दोन दिवस या मॅडम हवेतच असतात. सोबतच्या सहकार्यांना काम सांगत त्यांनी आपला चांगलाच तोरा गाजवला.
दोन दिवसांनी जेव्हा त्यांचा प्रभारी कार्यकाळ संपला तेव्हा त्यांच्या साहेबांनी थेट या मॅडमने केलेली स्वाक्षरी व घेतलेले निर्णय रद्द ठरवले आणि त्यांना त्यांच्या कामावरच लक्ष द्यायला सांगितले.
दोन दिवस आपण किती चांगले काम करत होतो, या अर्विभावात वावरत असलेल्या मॅडम अचानक जमिनीवर आल्या. इतकेच नव्हे तर निमूटपणे काम करायला लागल्या पण, साहेबांविषयी त्यांनी बोटं मोडायला सुरवात केली, हे मात्र सांगायलाच नको.