नारोशंकराची घंटा : अन् जावयांची झाली व्यवस्था | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Narhari Zirwal

नारोशंकराची घंटा : अन् जावयांची झाली व्यवस्था

लग्न असो की, कोणताही कार्यक्रम यात जावयांचा मानपान बघितला जातो. जावयांचे देखील सासूरवाडीवर प्रेम असते. विविध माध्यमातून तो जावई सासूरवाडीसाठी काहींना काही करत असतो.

साधी राहणी अन उच्च विचारसरणी असलेल्या एक जावई थेट विधीमंडळापर्यंत पोहचला. केवळ पोहचला नाही तर, तेथेही त्यांनी उपाध्यक्षपदावर मजल मारत, अध्यक्षांसारखे सर्वोच्च पद गाजविले. या पदाचा उपयोग करून आतापर्यंत आपल्या गावासह सासूरवाडीला त्यांनी भरभरून दिले. (naroshankarachi ghanta sakal special on arrangements made for sons in law nashik news)

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

पण यावेळी अशी गोष्ट दिली की, एका शासकीय कार्यक्रमात सासूरवाडीतील महिला बचत गटाला धनादेशाचे वाटप करण्यात आले. त्यावेळी जावयाने महिला बचत गटाच्या प्रतिनिधींना यातून काय करणार अशी विचारणा केली असता त्यांनी कुक्कुटपालन व्यवसाय करणार असल्याचे सांगितले.

हाच धागा पकडत पालकमंत्र्यांनी एरव्ही भाषणातून सर्वांची फिरकी घेणाऱ्या जावयाची फिरकी घेतली. बचत गटाच्या माध्यमातून कुक्कुटपालन व्यवसाय उभा राहणार असला तरी, सोय मात्र जावयाची होणार असल्याचे सांगत, जावयाचे लाड आता पुरे होतील, असे बोलत जावयाची टोपी उडविली.