
नारो शंकराची घंटा : भाऊ.. घ्या दोन वडे
एका सार्वजनिक कार्यक्रमानिमित्त दोघं व्यक्ती भेटल अन् त्यांच्यात गप्पा रंगल्या. पाच मिनिटे झाले अन् कार्यक्रमस्थळी खमंग साबुदाणा वड्याचा सुगंध दरवळला. दोघांपैकी एकाला आली वडा खाण्याची तलफ. (naroshankarachi ghanta sakal special on mahashivratri fast nashik news)
अन् त्यातून विनोदी किस्सा घडला नाही तरच नवल. तर झाले असे, गप्पा मारत असताना, मनोमन वडा खाण्याची इच्छा असलेल्याकडून त्याच्या मित्राला वड्यासाठी विचारणा झाली. ‘उपवास असेल, चल वडा खाऊया’ असे म्हणत त्याने विषय छेडला.
आता दुसऱ्या व्यक्तीला वडा खाण्यात काही इंटरेस्ट नव्हता. त्यामुळे त्याने लागलीच नकार दिला. पण तलफ तर भागवायची होती. म्हणून ‘एक वड्याने काय होतं’ असे म्हणत पुन्हा आग्रह धरण्यात आला. त्यावर ‘नको’ असा एका शब्दात अनपेक्षित उत्तर आल्याने ज्याला वडा खायचा होता, त्याचा मनस्ताप व्हायला लागला.
हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?
‘अरे.. चल.. इतका टेस्टी वडा आहे, खायला तर लागेलच’ असे म्हणत पुन्हा गळ घालण्याचा प्रयत्न झाला. आता त्यावर पुन्हा अनपेक्षित उत्तर आले...‘अहो, माझा कडक उपवास आहे. तर मला नाही चालणार’ असे म्हणत पुन्हा आग्रह होण्याआधी संबंधिताने काढता पाय घेतला.
अन् वड्याचा आग्रह धरणाऱ्याला लाजल्यासारखे झाले. अन् या संवादातून उपस्थितांचे मनोरंजन झाले. आता तलफ भागवायचीच म्हटल्यावर काही मिनिटांनी हौशी कार्यकर्त्याने दुसरा परिचित पकडला अन् वड्याचे काउंटर गाठलेच.