नारोशंकराची घंटा : संपत्तीचे राजकीय वारस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

politicians

नारोशंकराची घंटा : संपत्तीचे राजकीय वारस

राजकीय व्यक्ती सत्तेत असल्या की त्यांना आपली संपत्ती वाढवण्याची भारी हौस असते. त्यात मंत्रिपद मिळालेले असेल तर विचारायलाच नको. या नातेवाईच्या नावे थोडी तर त्या नातेवाईच्या नावावर थोडी प्रॉपर्टी करून भविष्याची तजवीज करत असतात.

पण दुर्दैवाने एखादा नातेवाईक ही प्रॉपर्टी माझीच आहे, असे म्हटला तर काय करणार? तर झाले असे की, नाशिकमधील एका नेत्याने स्वत:च्या नातेवाइकांच्या नावावर काही जागा, प्लॉट खरेदी केले. नेता सत्तेबाहेर गेला आणि त्यांनी आपल्या संपत्तीची चौकशी सुरु केली. (naroshankarachi ghanta sakal special on Political Heir to Wealth nashik news)

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

एकापाठोपाठ एका नातेवाईकाला जवळ बोलावून घेत आता माझी मालमत्ता माझ्याकडे सुपूर्द कर म्हणून आवाहन केले. पण काही नातेवाईक भलतेच हुशार निघाले. त्यांनी संपत्ती परत करायला नकार दिला.

या नेत्याचाही नाइलाज झाला. ‘तोंड दाबून बुक्याचा मार’ अशी त्यांची अवस्था झाली. कुणाला सांगताही येईना आणि सहनही होईना अशी त्यांची अवस्था झाली. काही दिवसानंतर या नेत्याचं निधन झालं.

त्यानंतर प्रॉपर्टीचेही चार वाटे करण्यासाठी भाऊ आग्रह धरु लागले. पण एकमत होत नसल्याने अखेर त्यांचाही मृत्यू झाला. प्रॉपर्टीला वारस काही मिळाला नाही. अखेर एका हिरे व्यापाऱ्याने हा सर्व गुंता सोडवला आणि स्वत:च्या नावे संपत्ती करून घेतली, आता बोला