नारोशंकराची घंटा : मग खुशाल फिरा उन्‍हात.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Summer

नारोशंकराची घंटा : मग खुशाल फिरा उन्‍हात..

सध्या उन्‍हाच्‍या असहय्य झळा जाणवत आहेत. दुपारच्‍या वेळी रस्‍त्‍यावर फिरणे मुश्‍कील झाले आहे. अशावेळी प्रत्‍येक जण स्‍वतःची काळजी घेत बचावात्‍मक उपाययोजना करतय. अन्‌ इतरांनाही उन्‍हापासून बचाव करण्याचा सल्‍ला दिला जातोय.

सल्‍ला देण्याच्‍या या संवादातून एक विनोदी किस्सा नुकताच एका ठिकाणी घडला. भर उन्‍हातून आलेल्‍या कार्यालयीन सहकार्यासोबतचा हा संवाद. दुपारी एकच्‍या सुमारास तप्त उन्‍हातून आलेल्‍या आपल्‍या सहकार्याला उद्देशून अन्‍य सहकारी म्‍हणाला, ‘उन खूप वाढले आहे, काळजी घ्यावी जरा, बाहेर फिरणे कमी करावे’. (naroshankarachi ghanta Then walk happily in sun nashik news)

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

नारोशंकराची यावर संबंधित उत्तरला, ‘काही नाही हो, आपले काम आहे ते करावेच लागेल ना’. यावर ‘हो बरोबर आहे, पण उन्‍हाची वेळ सांभाळून पण काम करता येऊ शकते ना.’ पण संबंधित काही ऐके ना.. लगेच प्रतिउत्तर आले.

आपण उन्‍हाराणाची माणसं, आपल्‍याला काय फरक पडतो या उन्‍हानं'. सल्ला देणाऱ्या सहकार्याच्‍या आता हसू आवरेच ना. संबंधित काही आपले ऐकणार नाही, हे लक्षात आल्‍यावर जोरात हसत 'खुशाल उन्‍हात फिरा, आमचं काय' असे म्‍हटल्यावर तप्त उन्‍हात हास्य फवारे उडाल्‍याने वातावरण काहीसे शीतल झाले.

टॅग्स :Nashiksummer