नारोशंकराची घंटा : हौशी मामाचा चुकलेला कोट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Suit

नारोशंकराची घंटा : हौशी मामाचा चुकलेला कोट

नाशिक : लग्नात नवरीच्या मामांना कर्तव्याचा फार मान असतो. त्यात मामा जर हौशी असेल, तर विचारायलाच नको. लग्नतिथी दाट असली, तरी आवर्जून सगळ्यांनी उपस्थित राहावं, यासाठी मामाने स्वत: पत्रिका घरोघरी पोचवल्या. (NaroShankarachi ghanta uncle suit sakal special nashik news)

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

कार्य तर उत्तम प्रकारे पार पडेल; पण आपणही जरा उठून दिसायला पाहिजे, या विचाराने मामाने आकर्षक कोट शिवायचा बेत आखला. त्यात नवरीचे वडील, चुलते आणि दोन मामांनाही सहभागी करून घेतले.

टेलरही नामांकित निवडला. त्याच्याकडे सगळ्यांचे माप देऊन झाले. लग्नसोहळ्याच्या दोन दिवस आधी सगळ्यांचे कपडेही घरपोच आले. दुसऱ्या दिवशी हळदीची सगळी गडबड असल्याने लग्नाच्या दिवशीच सकाळी कपड्यांकडे बघायला मुहुर्त लागला.

कोट परिधान केल्यावर मात्र पोटावरील बटण काहीकेल्या लागेना. लावले तर वरचे बटण तुटण्याची शक्यता वाढली. आता ऐनवेळी काय करायचं, म्हणून हौशी मामाने पुन्हा सुपीक कल्पना लढवली.

कोट घालायचा, पण बटण लावायचे नाही. ही आयडिया चांगलीच कामात आली आणि मामाही लग्नात उठून दिसला. बाकी लग्नाचे फोटो आल्यानंतर कळेलच...

टॅग्स :Nashikclothes