

नाशिक : विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्जांच्या पडताळनीनंतर आता ३३६ जणांचे अर्ज वैध ठरले आहेत. अर्ज माघारीसाठी ४ नोव्हेंबरपर्यंत अंतिम मुदत असताना बुधवारी (ता. ३०) हर्षा बडगुजर यांनी पहिला अर्ज मागे घेतला. त्यामुळे माघारीनंतर उमेदवारांची संख्या आणि नेमक्या लढती निश्चित होतील. जिल्ह्यातील एकूण १५ विधानसभा मतदारसंघांत बुधवारी (ता. ३०) अर्ज छाननीची प्रक्रिया पार पडली. (446 applications of 336 candidates are scrutinized and 25 candidates were disqualified in different constituencies of district )