गिरणारेत टोमॅटो उत्पादकांना व्यापाऱ्याचा गंडा | NASHIK | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टोमॅटो

नाशिक : गिरणारेत टोमॅटो उत्पादकांना व्यापाऱ्याचा गंडा

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : गिरणारे (ता. नाशिक) येथील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना लाखोचा गंडवून व्यापारी फरार झाल्याची जोरदार चर्चा आहे. मात्र, संबधित व्यापारी येईल, या आशेवर शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंत पोलिस ठाण्यात तक्रार दिली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

टोमॅटोला सध्या बरे भाव मिळत आहे. कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्याने बाजार समित्यांसह परिसरातील बाजार सक्रिय झाले आहेत. तालुक्यातील गिरणारे या मोठ्या गावातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांकडून टोमॅटो खरेदी करून एक व्यापारी गायब झाला असल्याची चर्चा आहे.

हेही वाचा: मुंबई : औषधांच्या किमती वाढविण्यासाठी कंपन्यांचा केंद्र सरकारवर दबाव

कथित फसवणूक प्रकरणी परिसरातील वेगवेगळ्या सोशल मीडियावर उघडपणे चर्चा सुरू आहे. मात्र, नेमक्या किती रुपयांचा गंडा घातला याविषयी माहिती पुढे आलेली नाही. फसवणूक झालेल्यांपैकी काही शेतकऱ्यांना अजूनही व्यापारी परत येईल व पैसे देईल, अशी आशा आहे. त्यामुळे पोलिसांकडे अद्याप तक्रार दिलेली नाही.

गिरणारेत शेतकऱ्यांना गंडविल्याचा प्रकाराची चर्चा आहे. मात्र व्यापारी येईल, या भरवशावर असलेल्या शेतकऱ्यांकडून अद्याप तक्रार आलेली नाही. शेतकऱ्यांकडून तक्रार आल्यास त्वरित कारवाई केली जाईल.

-सारिका आहिरराव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, नाशिक

loading image
go to top