Nashik Accident : वणी-सापुतारा मार्गावर भीषण अपघात; तिघांचा दुर्दैवी मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik Accident

Nashik Accident : वणी-सापुतारा मार्गावर भीषण अपघात; तिघांचा दुर्दैवी मृत्यू

मागील काही दिवसांपासून नाशिकमधील अपघाताच्या घटना सातत्याने वाढताना दिसत आहेत. भरधाव वेग व वाहतूक नियमांचे उल्लंघन हे अपघातामागील मुख्य कारण असते. नाशिक जिल्ह्यातील वणी-सापुतारा मार्गावर काल (मंगळवारी) सायंकाळच्या सुमारास एका कारचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात दोन तरुणीसह एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर या अपघातात एकजण गंभीर जखमी झाला आहे.

तरुणांच्या अपघाती मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अंजली राकेश सिंग, नोमान चौधरी व सृष्टी नरेश भगत अशी मृतांची नावे आहेत. तर अजय गौतम हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वणीकडून सापुताराकडे जाणाऱ्या कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे चार मित्र-मैत्रिणी एका कारने वणीहून सापुताराकडे जात होते. त्यांची कार चौसाळे फाट्याच्यापुढे आली असताना, चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव वेगात असलेली कार रस्त्याच्या कडेला जाऊन पलटली. या भीषण अपघातात दोन तरुणीसह एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच, स्थानिक नागरिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील जखमीला तातडीने उपचारासाठी नाशिक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पोलिसांनी मृत तरुणांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.