Nashik Accident News : पाथर्डीफाटा परिसरात भरधाव ट्रकची वाहनांना धडक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Truck accident news

Nashik Accident News : पाथर्डीफाटा परिसरात भरधाव ट्रकची वाहनांना धडक

इंदिरानगर : पाथर्डीफाटा येथील आनंद नगर पोलिस चौकी समोरून भरधाव वेगाने जाणाऱ्या आयशर ट्रकने तीन-चार वाहनांना जोरदार धडक दिली. यात वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

हेही वाचा: Nashik News : मालेगावात आढळले 2 बांगलादेशी नागरिक; बनावट कागपत्रांद्वारे केला भारतात प्रवेश

आयशर ट्रक सायंकाळी साडेसातच्या सुमारास पाथर्डीफाटा येथे आयशर (एमएच ०६ एक्यू ६८००) ने रस्त्यावरील तीन ते चार वाहनांना जोरदार धडक दिल्याने वाहनांचे नुकसान झाले. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार वॅग्नर कार (एमएच १५ एचयू ४८६९) ही एक्स्प्रेस इन हॉटेल कडून दामोदर चौक कडे येत होती. या कारला आयशरने धडक दिली. या अपघातात वॅग्नर कारसह बलेनो कार (एमएच १५ जिए ०४९३) ब्रिजा कार (एमएच १५ जीए ९६९२) यांचे नुकसान झाले. अपघातात महिला पादचारीसह एका वाहनातील महिला व मुलगा जखमी झाला आहे.

First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने

हेही वाचा: Nashik Crime News : उसने पैसे परत न केल्याने जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

यावेळी रस्त्यावरील एक फळ विक्रेत्याच्या हात गाडीसही धडक बसल्याने त्याच्या गाड्यासह मालाचेही नुकसान झाले आहे. याबाबत आयशर ट्रक चालक रामचंद्र शांताराम पाटीलवर इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास इंदिरानगर पोलिस करत आहे.

टॅग्स :Nashikaccident