Nashik Accident News : ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील महिला ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident News

Nashik Accident News : ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील महिला ठार

नाशिक : आडगाव येथील मुंबई- आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलाजवळ ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील महिला ठार झाली, तर पती गंभीररीत्या जखमी आहे. शोभा तुकाराम ठोंबरे (४२) असे मयत महिलेचे नाव आहे.

ठोंबरे या पतीसमवेत चांदवड तालुक्यात मूळ गावी जात होत्या. या वेळी त्यांच्या दुचाकीला आडगाव परिसरात अज्ञात ट्रकने धडक दिल्याचे समजते. (Nashik Accident Update Woman on two wheeler killed in collision truck Nashik News)

हेही वाचा : ढोलेरा- ग्रीनफिल्ड सिटी आणि महाप्रचंड औद्योगिक हब...

या अपघातामध्ये शोभा यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी आडगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरु आहे. दरम्यान, दुचाकीचालक ठोंबरे यांनाही गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.