

नाशिक : उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत नवनवीन घडामोडींनी चर्चेत राहिलेल्या नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात अदिती ढिकले, चंद्रभान पुरकर, चंद्रकांत साडे व राजेश लांडगे या चौघांचे अर्ज बाद ठरले आहेत. आता १५ उमेदवार रिंगणात शिल्लक असून, त्यांपैकी किती जण माघार घेतात किंवा कसे याकडे लक्ष लागून आहे. भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलेले गणेश बबन गिते यांच्याविरोधात इगतपुरीचे गणेश बबन गिते यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्याने या मतदारसंघात ‘भगरे पॅटर्न’ची चर्चा सुरू झाली आहे. (Applications of Aditi Dhikle Landge Purkar Sade rejected 27 applications of 15 candidates valid )