108 जणांवर मोक्का; 250 जणांना सुधारण्याचा मोका!

deepak pandey
deepak pandeyesakal

नाशिक : शहर पोलिसांनी संघटित गुन्हेगारीतून खून, दरोडे, सामूहिक बलात्कारांसह जमिनीसाठी खून करणाऱ्या भूमाफियासह शंभरांहून अधिक सराईत अट्टल गुन्हेगारांवर मोक्कांर्तगत कारवायांचा विक्रम करीत ८१ जणांना गजाआड केले. अवघ्या पाच महिन्यांत शहर पोलिसांनी दहा वर्षांतील मोक्का कारवायांचा विक्रम मोडीत काढला आहे. नाशिकच नव्हे, तर राज्यातील हा विक्रम असावा. (Nashik-city-police-action-in-five-months-marathi-news)

गुन्हेगारी प्रतिबंधसारख्या कारवायांतून सुधारण्याची संधी

राज्यातील कारागृहातील कुख्यात गुन्हेगारीचा अभ्यास असलेल्या पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी कारवायांसोबत चांगल्या वर्तणुकीची हमी देणाऱ्यांसाठी गुन्हेगार सुधार कार्यक्रम हाती घेत चांगल्या वर्तणुकीच्या हमीपत्रावर सुधारण्याची संधी दिली आहे. मोक्का, तसेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधसारख्या कारवायांतून सुधारण्याची संधी दिली आहे.

अडीचशे गुन्हेगारांचा प्रतिसाद

पोलिस आयुक्तांच्या उपक्रमाला शहरातील विभाग एक- ६९, विभाग दोन- ६४, विभाग तीन- ५४, विभाग चार- ६३ याप्रमाणे २५० गुन्हेगारांनी प्रतिसाद देत पोलिसांना गुन्हेगारी सोडून समाजविघातक कृत्यात सहभागी न होण्याचे हमीपत्र लिहून दिले आहे. चांगल्या वर्तणुकीच्या हमीपत्रासोबत अनेकांना रोजगारांची संधी देत पोलिसांनी गुन्हेगार सुधार कार्यक्रम व्यापक स्वरूपात राबविला आहे. आठवडाभरात सराईत गुन्हेगारांपैकी अडीचशेवर गुन्हेगारांनी गुन्हेगारीचा मार्ग सोडून सुधारण्याची तयारी दर्शविल्याने त्याचा शहरातील गुन्हेगारी नियंत्रणावर चांगला परिणाम दिसणार आहे.

deepak pandey
कांदा दोन हजार पार; आवक वाढली

मोक्का कारवायांचे शतक

दहा वर्षांत मोक्का कायद्यांतर्गत झाल्या नाहीत तेवढ्या कारवाया गेल्या पाच महिन्यांत झाल्या आहेत. शहर पोलिसांनी मोक्कांतर्गत केलेल्या कारवाया शहरातील दहा वर्षांतील पोलिसांचा विक्रमच आहे. आतापर्यंत मोक्का कारवाया केलेल्यांची संख्या १०८ झाली आहे. अंबड पोलिसांनी तब्बल ३३ संशयितांवर मोक्का कारवाया प्रस्तावित केल्या होत्या. मात्र, त्यातील सहा संशयितांनी चांगल्या वर्तणुकीची हमी दिल्याने त्यांना मोक्का कारवायातून वगळून हमीपत्र घेऊन सुधारण्याची संधी दिली. त्यात आकाश विलास जाधव (वय २४, रा. पंचवटी), श्रीनिवास सुरेंद्र कानडे (२८, कॉलेज रोड), किरण दिनेश नागरे (३८, मखमलाबाद), अजय दिलीप बागूल (३४, रामवाडी, पंचवटी), पवन शिवाजी कातकाडे (३४, राणेनगर), रोहीन आनंद उघाडे (वय २९, सिडको) अशी हमीपत्र दिलेल्या संशयितांची नावे आहेत.

deepak pandey
इगतपुरीतील रिसॉर्ट..पावसाळा अन् पार्ट्यावरील छापे चर्चेत

निकोप समाजासाठी गुन्हेगार नव्हे, तर गुन्हेगारी संपविणे हे पोलिसांचे उद्दिष्ट आहे. गुन्हेगार सुधार योजना २०२१ हा त्याचाच एक भाग आहे. वाट चुकलेल्यांना चांगले नागरिक बनण्याची संधी देताना त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. एवढी संधी देऊनही ज्यांना गुन्हेगारी सोडायचीच नसेल, अशांसाठी मोक्का, हद्दपारी, एमपीडीए यांसह पोलिसांचे इतर उपाय आहेतच. -दीपक पांडे, पोलिस आयुक्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com