धुक्‍याने दाटले नाशिक शहर

शीतलहरींमुळे गारव्‍यात वाढ, किमान तापमान १४.८ अंश
Nashik city fog Cold
Nashik city fog Coldsakal

नाशिक : गेल्‍या तीन ते चार दिवसांपासून वातावरणातील गारवा कमी झाला होता. मात्र रविवारी (ता. २३) ढगाळ वातावरण व वातावरणातील शीतलहरींमुळे गारव्‍याची तीव्रता पुन्‍हा वाढली होती. दिवसभर अनेक ठिकाणी धुकेसदृश स्‍थिती शहरात विविध ठिकाणी बघायला मिळाली. दरम्‍यान, नाशिकचे किमान तापमान १४.८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.(Nashik city fog Cold snap increases temperature)

Nashik city fog Cold
Punjab Assembly Election: पंजाबी सूरसम्राट जनतेच्या दारात

काही दिवसांपूर्वी नाशिकच्‍या तापमानात अचानकपणे घसरण होऊन, सात अंश सेल्सिअस इतक्‍या किमान तापमानाची नोंद झाली होती. तेव्‍हापासून वातावरणात गारठा कायम होता. मकरसंक्रांतीपासून गारवा काहीसा कमी झाल्‍याची अनुभूती नागरिकांना येत होती. रविवारी (ता. २३) रात्री पाऊस झाल्याने वातावरणात गारठा वाढल्‍याचे अनुभवायला आले. शीतलहरींमुळे थंडीची तीव्रता अधिक वाटत होती.

ढगाळ वातावरण आव्‍हानात्‍मक

रविवारी सकाळपासून आकाश ढगांनी व्‍यापले होते. त्‍यामुळे सूर्य झाकोळला गेला होता. यामुळे धुकेसदृश स्‍थिती निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी वातावरणात धूलिकण दिसत होते. दिवसभर ढगाळ वातावरणामुळे आव्‍हानात्‍मक परिस्‍थिती कायम राहिली.

Nashik city fog Cold
नियंत्रण रेषेवर बेपत्ता झालेल्या तरुणाला चीनमधून आणण्याची प्रक्रिया

आजार बळावण्याची शक्‍यता

वातावरणातील बदलांमुळे आरोग्‍याचे प्रश्‍न गंभीर होण्याची शक्‍यता आहे. विशेषतः श्‍वसनाचे आजार असलेल्‍या रुग्‍णांसाठी हे वातावरण त्रासदायक ठरू शकते. आधीच साथीच्‍या आजारांचा प्रादुर्भाव असताना, आता पुन्‍हा वातावरणात अनपेक्षित बदल घडल्‍याने आजार बळावण्याची शक्‍यता व्‍यक्‍त होत आहे. त्‍यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले जात आहे.

Nashik city fog Cold
केंद्राने बेताने खर्च करावा : रघुराम राजन

ढगाळ वातावरण आव्‍हानात्‍मक

रविवारी सकाळपासून आकाश ढगांनी व्‍यापले होते. त्‍यामुळे सूर्य झाकोळला गेला होता. यामुळे धुकेसदृश स्‍थिती निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी वातावरणात धूलिकण दिसत होते. दिवसभर ढगाळ वातावरणामुळे आव्‍हानात्‍मक परिस्‍थिती कायम राहिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com