नाशिककरांना भरली हुडहुडी! नाशिक ८.२ तर निफाड ७.६ अंश; ग्रामीण भागात जनजीवनावर प्रभाव

nashik cold.jpg
nashik cold.jpg

नाशिक : जिल्ह्यातील तापमानात सातत्याने घसरण होत असून, बुधवारी (ता. 23) नाशिकचे किमान तापमान ८.२ अंश तर निफाडचे ७.६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. यंदाच्‍या हंगामातील हे नीचांकी तापमान आहे. विशेषतः ग्रामीण भागात गारठ्यामुळे जनजीवनावर प्रभाव होत आहे. 

शीतलहरींमुळे गारठा वाढला
वातावरणातील शीतलहरींमुळे गारठा अधिक प्रमाणात जाणवू लागला आहे. विशेषतः रात्रीच्‍या वेळी वातावरणात कमालीचा गारवा जाणवत असल्‍याने नागरिकांना बचावात्‍मक उपाययोजनांवर भर द्यावा लागत आहे. दरम्यान, मंगळवारी नाशिकचे कमाल तापमान २८.२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. राज्‍यात परभणी येथे ७.६ अंश सेल्सिअस अशा किमान तापमानाची नोंद झालेली असून, हे ठिकाण सर्वाधिक गारठलेले ठरले आहे. त्‍यापाठोपाठ गोंदिया (७.८), पुणे (८.१), नागपूर (८.६), जळगाव (९.०), सातारा (९.०), औरंगाबाद (९.२), अकोला (९.६) हे भाग देखील गारठले आहेत. 

हेही वाचा >> डॉक्टरांचे ऐकले असते तर आज 'त्यांचे' प्राण वाचले असते! परिसरात हळहळ

आज बुधवारी निफाड ७.६ अंश 
निफाड : कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात मंगळवारी किमान तापमान ६.५ अंश नोंदले गेले. रब्बीसाठी पोषक हवामान होत असले तरी द्राक्ष उत्पादकांची डोकेदुखी या थंडीमुळे वाढली आहे. कडाक्याच्या थंडीने तालुका गारठल्याने ठिकठिकाणी शेकोट्या पेटवून नागरिक उब मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. या थंडीने हरभरा व गव्हाच्या पिकाला फायदा होणार आहे. दुसरीकडे ऐन भरात येण्याच्या तयारीत असलेला द्राक्ष हंगाम मात्र यामुळे प्रभावित होणार असून, द्राक्षमन्यांना तडे जाण्याची भीती व्यक्त होत आहे. तसेच, द्राक्षवेलीच्या मुळ्या बंद पडणे, द्राक्षघडाचा विकास खुंटणे असे धोकेही या थंडीमुळे निर्माण झाले आहेत. त्यातच आणखी पारा घसरण्याचे संकेत मिळाले आहेत.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com