esakal | Corona Update : जिल्ह्यात तीन हजार 457 पॉझिटिव्‍ह, 6 हजार 207 कोरोनामुक्‍त

बोलून बातमी शोधा

corona update
Corona Update : जिल्ह्यात तीन हजार 978 पॉझिटिव्‍ह, 6 हजार 207 कोरोनामुक्‍त
sakal_logo
By
अरुण मलानी

नाशिक : जिल्‍ह्‍यात कोलमडलेली आरोग्‍य व्‍यवस्‍था, ऑक्‍सीजन व आवश्‍यक औषध-इंजेक्‍शनचा तुटवडा यामुळे कोरोना बळींची संख्या घटत नसल्‍याची स्‍थिती आहे. गुरुवारी (ता.29) दिवसभरात 38 बाधितांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला आहे. यात सात मृत हे वयाच्‍या पस्‍तीशी किंवा त्‍यापेक्षा कमी वयातील आहेत. दिवसभरात तीन हजार 978 रुग्‍णांचा अहवाल पॉझिटिव्‍ह आला असताना, कोरोनामुक्‍त झालेल्‍या रुग्‍णांची संख्या सहा हजार 207 राहिली. यातून ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण संख्येत घट झाली असून, सद्यस्‍थितीत 42 हजार 313 बाधितांवर उपचार सुरु आहेत.

जिल्‍ह्‍यात कोरोना बाधितांच्‍या बळींची संख्या अद्यापही नियंत्रणात नाही. गुरुवारी झालेल्‍या 38 मृत्‍यूंमध्ये नाशिक ग्रामीणमधील पंचवीस, नाशिक शहरातील नऊ, तर मालेगाव महापालिका क्षेत्रातील चार मृतांचा समावेश आहे. नाशिक ग्रामीणमध्ये निफाड व येवला तालुक्‍यातील प्रत्‍येकी पाच, नाशिक तालुक्‍यातील तीन, चांदवड, कळवण, पेठ, दिंडोरी तालुक्‍यातील प्रत्‍येकी दोन, नांदगाव, मालेगाव ग्रामीण, इगतपुरी व सटाणा तालुक्‍यातील प्रत्‍येकी एका बाधिताने कोरोनामुळे जीव मगावला.

हेही वाचा: लस दोनदा घेतली... मी जिवंत आहे बघा!

मृतांंमध्ये चौदा वर्षीय मुलगा

येवला तालुक्‍यातील मलखेडा येथील 14 वर्षीय मुलासह अंदरसुल येथील 34 युवक, नांदुरमध्यमेश्‍वर (ता.निफाड) येथील 35 वर्षीय, चांदवड येथील 35 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्‍यू झाला आहे. नाशिक शहरातील जेलरोड येथील 30 वर्षीय, लक्ष्मीनगर येथील 32 वर्षीय, वणी (ता.दिंडोरी) येथील 35 वर्षीय महिलेचा मृत्‍यू झाला आहे.

बरे होणाऱ्या रुग्‍ण संख्येत वाढ

सलग दुसर्या दिवशी कोरोनावर मात केलेल्‍या रुग्‍णांची संख्या लक्षणीय राहिली. सहा हजार 207 रुग्‍ण कोरोनामुक्‍त झाले असून, यात नाशिक शहरातील तीन हजार 952, नाशिक ग्रामीणमधील दोन हजार 142, मालेगावचे 73, तर जिल्‍हाबाहेरील चाळीस रुग्‍णांनी कोरोनावर मात केली. तुलनेत जिल्‍ह्‍यात आढळलेल्‍या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरातील दोन हजार 079, नाशिक ग्रामीणमधील एक हजार 796, मालेगावचे 37, जिल्‍हा बाहेरील 66 रुग्‍णांचा अहवाल पॉझिटिव्‍ह आला.

हेही वाचा: माणुसकी जिवंत आहे! रुग्णांसाठी स्वत:ची कार केली रुग्णवाहिका

आठ हजार 885 अहवाल प्रलंबित

प्रलंबित अहवालांच्‍या संख्येत वाढ झाली असून, सायंकाळी उशीरापर्यंत आठ हजार 885 रुग्‍णांना अहवालाची प्रतिक्षा होती. यापैकी नाशिक ग्रामीणमधील सर्वाधिक पाच हजार 718, नाशिक शहरातील दोन हजार 742, मालेगावच्‍या 415 रुग्‍णांना अहवालाची प्रतिक्षा होती. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात पाच हजार 151 रुग्‍ण दाखल झाले. यापैकी नाशिक महापालिका क्षेत्रातील चार हजार 832 रुग्‍णांचा समावेश आहे. जिल्‍हा रुग्‍णालयात सोळा, डॉ.वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात ऐकोणावीस रुग्‍ण दाखल झाले. नाशिक ग्रामीणमध्ये 238, मालेगावला 46 रुग्‍णांचा समावेश आहे.