Breaking News: सातपूर परिसरात तरुणावर गोळीबार करत जिवघेणा हल्ला; नागरिकांमध्ये दहशत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Breaking News: सातपूर परिसरात तरुणावर गोळीबार करत जिवघेणा हल्ला; नागरिकांमध्ये दहशत

Nashik : शहरातील सातपूर येथील कार्बन नाका परिसरात असलेल्या म्हसोबा मंदिराजवळ तरुणावर जिवघेणा हल्ला झाला आहे. आपसातील जुन्या वादातून तिघांनी तरुणावर गोळीबार तसेच कोयत्याने वार केले. यानंतर मारेकऱ्यांनी आपले वाहन घटनास्थळी सोडून कामगाराला धाक दाखवत त्याच्या दुचाकीने पळ काढला. ही सिनेस्टाईल घटना रविवारी (ता. १९) दुपारी घडली.

रविवारी दुपारी तपन जाधव आपल्या चारचाकीमधून (MH 04 EX 5678) प्रवास करत असताना कार्बन नाका परिसरात आरोपी आशिष जाधव आपल्या २ साथीदारांसह (MH 15 DM 7639) या वाहनातून येत तपनच्या गाडीला धडक दिली. यानंतर गाडीखाली उतरत त्याच्यावर कोयत्याने वार केले यासह गोळीबार केला.

तिघांनी मिळून केलेल्या या हल्ल्यात तपन जाधव गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

कामगाराची दुचाकी पळवली

घटनेनंतर धडक बसल्याने आरोपींची गाडी बंद पडली होती. यामुळे त्या मार्गावरुन जाण्याऱ्य़ा एका कामगाराला आरोपींनी थांबवले. बंदूक अन् कोयत्याचा धाक दाखवत त्या कामगाराची दुचाकी (MH 15 FU 7656) घेऊन आरोपींनी घटनस्थळावरुन पळ काढला.

या घटनेमुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान पोलिसांपुढे उभे राहीले आहे. घटनेची माहिती मिळताच शहर गुन्हेशाखा, सातपूर पोलिसांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

टॅग्स :NashikCrime News