esakal | Nashik : पंचवटीत डेंगी, चिकूनगुनियाच्या रुग्णसंख्येत वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

पंचवटीत डेंगी, चिकूनगुनियाच्या रुग्णसंख्येत वाढ

नाशिक : पंचवटीत डेंगी, चिकूनगुनियाच्या रुग्णसंख्येत वाढ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिक शहरात डेंगी, चिकूनगुनिया व अन्य आजारांच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. काही दिवसांपासून पंचवटी विभागात या आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ चिंताजनक आहे. कोरोनानंतर उद्‌भवलेल्या या आजारावर मात करण्यासाठी काळजी घेण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. मागील महिन्यापासून पंचवटी गावठाणासह विविध उपनगरांत डेंगी व चिकूनगुनियाग्रस्त रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या आडगाव, म्हसरूळ, मखमलाबाद, नांदूर, मानूर आदी ग्रामीण भागातही रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे.

ऑक्टोबर हीट, तसेच पावसाने थैमान घातल्याने रुग्णसंख्येत वाढ झाली असून, परिसराच्या स्वच्छतेसह घराजवळ पाण्याचे डबके साच देऊ नका, तसेच घरातील पाण्याचाही अतिरिक्त साठा न करण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. साचलेले पाणी, अस्वच्छतेमुळे डासांच्या संख्येत मोठी वाढ झाल्यामुळे हे रुग्ण वाढले आहेत.

हेही वाचा: जोतिबाच्या जागराला डोंगर हाऊस फूल्ल; दिड लाख भाविक

वारंवार येणारा ताप, अंगावर बारीक चट्टे आल्यास ती डेंगीची लक्षणे असून, सांधेदुखी वारंवार उद्‌भवल्यास ती चिकूनगुनियाचे लक्षणे समजून त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन महालिकेच्या पंचवटी विभागाचे मुख्य आरोग्याधिकारी डॉ. विजय देवकर यांनी केले आहे. महापालिका रुग्णालयातही यावर उपचार सुरू असल्याचे त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

डेंगी, चिकूनगुनियाच्या रुग्णांत वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत प्रतिकारशक्ती ढळू देऊ नका.गुळवेल आदी औषधांचा वापर करा. पाणी उकळून प्या. लहान मुलांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी च्यवनप्राश द्या.

-डॉ. नीलेश कुंभारे, अध्यक्ष, पंचवटी मेडिकल असोसिएशन

पंचवटीतील अनेक भागांत असे रुग्ण आढळून येत आहेत. अशी लक्षणे आढळल्यास घाबरून न जाता त्वरित जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.

-डॉ. दिनेश बच्छाव, पेठ रोड

loading image
go to top