Nashik News : डिस्ट्रिक्ट ॲडव्होकेट्स सोसायटीवर आपलं पॅनलचा झेंडा; कार्यकारिणीसाठी पंचवार्षिक निवडणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

lawyer

Nashik News : डिस्ट्रिक्ट ॲडव्होकेट्स सोसायटीवर आपलं पॅनलचा झेंडा; कार्यकारिणीसाठी पंचवार्षिक निवडणूक

नाशिक : येथील दि. नाशिक डिस्ट्रिक्ट अॅडव्होकेट्स को- ऑपरेटीव्ह सोसायटीच्या निवडणुकीत ‘आपलं पॅनल’ ने परिवर्तन पॅनलचा धुव्वा उडवून झेंडा रोवला.

आपलं पॅनलचे १२ उमेदवार निवडून आले. (Nashik District Advocates Cooperative Society election 12 candidates were selected by Apla Panel nashik news)

वकील मतदारांनी १७ सदस्यांना मतदान करून संचालकपदी विराजमान केले आहे. विजयी उमेदवारांत १२ वकील हे आपलं पॅनलचे तर, उर्वरित पाच वकील परिवर्तन पॅनलचे विजयी आहेत.

सोसायटी संचालक मंडळाच्या सन २०२३ ते २०२८ या कार्यकारिणीसाठी पंचवार्षिक निवडणूक घोषित करण्यात आली होती. निवडणूक निर्णय अधिकारी कैलास आढाव यांनी अंतिम निकाल जाहीर केला.

त्यानुसार सर्वसाधारण गटातून १२ सदस्यांची निवड झाली तर, अनुसूचित जाती जमाती, इतर मागास प्रवर्ग, भटक्या विमुक्त जाती व जमाती प्रवर्गासाठी प्रत्येकी एक व महिला राखीव प्रवर्गासाठी दोन अशा एकूण १७ सदस्यांची निवड झाली आहे.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

विजयी उमेदवार असे (कंसात मिळालेली मते)

सर्वसाधारण गट : अॅड. सुदाम गायकवाड (८०९), अॅड. खराटे प्रभाकर (८१८), अॅड. पांडुरंग तिदमे (९३८), अॅड. भारत ठाकरे (९६१), अॅड. प्रभाकर घुमरे (७९१), अॅड. अनिल विघ्ने (८५९), अॅड. भास्कर मेढे (७५९), अॅड. भानुदास शौचे (७४२), अॅड. केशव शेळके (८७५),

अॅड. अरुण खांडबहाले (८४८), अॅड. संदीप पिंगळे (८५५), अॅड. धनंजय भोर (७३१). अनुसूचित जाती व जमाती : अॅड. प्रेमनाथ पवार (९०३)., इतर मागास प्रवर्ग : अॅड. रवींद्र ताजणे (९६५)., भटक्या विमुक्त जाती/जमाती : अॅड. सुरेश आव्हाड (८२८), महिला राखीव : अॅड. स्वप्ना राऊत (७२८), अॅड. सविता ठुबे-जगताप (८३३).

टॅग्स :NashikelectionLawyer