esakal | नाशिक जिल्‍ह्‍याची कोरोना रूग्णसंख्या 1 हजार पार
sakal

बोलून बातमी शोधा

nashik corona update

नाशिक जिल्‍ह्‍याची कोरोना रूग्णसंख्या 1 हजार पार

sakal_logo
By
अरूण मलाणी

नाशिक : जिल्‍ह्यातील नव्‍याने आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्‍या संख्येने सलग दुसऱ्या दिवशी शंभर ओलांडली. गुरुवारी (ता. २) दिवसभरात १३६ पॉझिटिव्‍ह आढळले, तर चार बाधितांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला. ८६ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वी मात केली. ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्येत ४३ ने वाढ झाली असून, सद्यःस्‍थितीत जिल्‍ह्यात एक हजार ६३ बाधितांवर उपचार सुरू आहेत.

८६ रुग्‍णांची कोरोनावर यशस्‍वी मात

गुरुवारी नाशिक महापालिका क्षेत्रात ५१ रुग्‍णांना कोरोनाची लागण झाली. नाशिक ग्रामीणमध्ये ८० रुग्‍ण कोरोनाबाधित झाले. जिल्‍हाबाहेरील पाच रुग्‍णांचा अहवाल पॉझिटिव्‍ह आला. मालेगाव महापालिका क्षेत्रात नव्‍याने कोरोनाबाधित आढळला नाही. दिवसभरात चार बाधितांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला. त्यापैकी तीन मृत नाशिक महापालिका क्षेत्रातील आहेत. एक मृत नाशिक ग्रामीणमधील आहे. ८६ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वी मात केली.
सायंकाळी उशिरापर्यंत ७२४ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा होती. यापैकी नाशिक ग्रामीणमधील ३१८, मालेगावचे २१०, तर नाशिक महापालिका क्षेत्रातील १९६ अहवाल प्रलंबित होते. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ९२१ रुग्‍ण दाखल झाले. यात नाशिक महापालिका क्षेत्रातील ८९७ रुग्‍णांचा समावेश आहे. जिल्‍हा रुग्‍णालयात दोन रुग्‍ण दिवसभरात दाखल झाले. उर्वरित २२ रुण नाशिक ग्रामीणमधील आहेत.

हेही वाचा: खरीपाला पावसामुळे दिलासा; रब्बीला मात्र जोरदारची प्रतिक्षा

दरम्‍यान, जिल्‍ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या चार लाख पाच हजार ६५३ झाली असून, यापैकी तीन लाख ९६ हजार तीन रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वी मात केली आहे. आतापर्यंत जिल्‍ह्यातील आठ हजार ५८७ बाधितांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

हेही वाचा: गेल्या वर्षी एकही नाही; यंदा बनविल्या बाप्पाच्या हजारो मुर्ती

loading image
go to top