मतदारयादी कार्यक्रमाला सुरवात | Nashik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाशिक बाजार समिती निवडणुका

नाशिक : मतदारयादी कार्यक्रमाला सुरवात

sakal_logo
By
योगेश मोरे

नाशिक : संचालक मंडळांची मुदत संपलेल्या बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी जाहीर केला. १० नोव्हेंबरपासून मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली. जिल्ह्यातील १५ बाजार समित्यांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी रंगणार आहे. सहकार क्षेत्रातही राजकीय पक्षांचा शिरकाव झाला आहे. मात्र, सहकार क्षेत्रात राष्ट्रवादीचा नेहमीच वरचष्मा राहिला असून, यातून सहकार क्षेत्रात आपले प्राबल्य सिद्ध केले आहे.

१५ बाजार समित्यांमध्ये जिल्ह्यातील सर्वाधिक लक्ष नाशिक बाजार समितीवर राहणार आहे. यंदाही देवीदास पिंगळे आणि शिवाजी चुंभळे यांच्या पॅनलमध्ये मुख्य लढत राहणार आहे. मात्र, सहकार क्षेत्रात तिसऱ्या पॅनलची चर्चा जोरात सुरू आहे अन् तो पॅनल कोण उभे करते की राजकीय खेळी असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: बारामती सहकारी बँकेच्या निवडणूकीचे बिगुल वाजले

असा आहे मतदारयादी कार्यक्रम

दिनांक - कार्यक्रम

 • १० नोव्हेंबर- जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करणे

 • १० ते २२ नोव्हेंबर- प्रारूप मतदारयादीवर आक्षेप व हरकती मागविणे

 • २२ नोव्हेंबर ते १ डिसेंबर- मतदारयादीतील आक्षेप व हरकतींवर निर्णय घेणे

 • ६ डिसेंबर- अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करणे

 • असा आहे निवडणूक कार्यक्रम

 • १६ डिसेंबर- निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे

 • १६ ते २२ डिसेंबर- अर्जविक्री व स्वीकृती

 • १६ ते २२ डिसेंबर- अर्जांची प्रसिद्धी

 • २३ डिसेंबर- छाननी

 • २४ डिसेंबर- वैध अर्जांची प्रसिद्धी

 • २४ डिसेंबर ते ७ जानेवारी- माघार

 • १० जानेवरी- निवडणूक चिन्हांसह अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध

 • १७ जानेवारी- मतदान

 • १८ जानेवारी- मतमोजणी

loading image
go to top