Electric Bus
Electric Bussakal

नाशिक : इलेक्ट्रिक बसला प्रतीक्षा केंद्राच्या सिग्नलची

महापालिकेचा प्रस्ताव मान्यतेसाठी पडून

नाशिक : महापालिकेने शहर बस सेवेसोबतच पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बसचा निर्णय घेतला आहे. सध्याच्या सीएनजी बससोबत इलेक्ट्रिक बसचा निर्णय झाला असला तरी, अद्याप इलेक्ट्रिक बस सुरू झालेल्या नाहीत. महापालिकेने ५० इलेक्ट्रिक बसचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविला असला तरी, महापालिकेच्या इलेक्ट्रिक बसला केंद्र शासनाकडून हिरवा कंदील मिळण्याची प्रतिक्षा कायम आहे.

महापालिकेच्या शहर बस वाहतूक सेवेमध्ये सीएनजी बस दाखल झाल्या आहेत, त्यांना प्रतिसाद चांगला मिळतो आहे. परिवहन सेवेसाठी सध्याच्या सीएनजी बसशिवाय काही इलेक्ट्रिक बस घेण्याचे नियोजन आहे. त्यासाठी महापालिका स्थायी समितीने ५० इलेक्ट्रिक बसचा प्रस्तावाला मंजुरी देत संबंधित प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्र शासनाकडे पाठविला आहे. मात्र, अद्याप केंद्राकडून हिरवा कंदील न आल्याने विषय रखडला आहे.

महापालिकेच्या सिटीलिंक शहर बस वाहतूक सेवेत इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या तर सध्याच्या पर्यावरणपूरक असलेल्या बससेवा अधिक बळकट होणार आहे. बसची संख्या वाढून अधिक नवनवीन मार्गावरुन बससेवा सुरू होणार आहे. शहरात ८ जुलै २०२१ पासून महापालिकेच्या शहर बस वाहतूक सेवेला सुरवात झाली. सुरवातीला ५० बसच्या माध्यमातून सुरू झालेली सिटी लिंकची शहर बस वाहतूक सेवा आज २५० बसच्या माध्यमातून शहरातील विविध मार्गांवर सुरू आहे.

सार्वजनिक वाहतूक सेवा अधिकाधिक बळकट करण्यासाठी केंद्र सरकार अनुदानाच्या रूपाने एका इलेक्ट्रिक बसला ५० लाख रुपये अनुदान आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक बसचा प्रस्ताव महापालिकेला परवडणार आहे. प्रतिबसला साधारण ५५ लाखांचे केंद्राकडून अनुदान अपेक्षित आहे. नाशिक महापालिकेने यापूर्वीच केंद्र शासनाकडे पहिल्या टप्यांत ५० बसला अनुदान मिळावे म्हणून प्रस्ताव पाठवला आहे, मात्र त्याला अद्याप केंद्र शासनाकडून मंजुरी मिळालेली नाही.

प्रश्न अनुदानाचा

एका इलेक्ट्रिक बसची किंमत दीड कोटी रुपये असून, त्यासाठी केंद्र सरकार प्रतिबसला ५० लाखांचे अनुदान देणार आहे. उर्वरित १ कोटी रुपये महापालिकेला मोजावे लागणार आहे. त्याप्रमाणे ५० इलेक्ट्रिक बस राज्य सरकार मोफत देणार असून, प्रत्येक वर्षी १० याप्रमाणे पाच वर्षात बस घेण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. बसच्या देखभाल दुरुस्तीचाही खर्च जास्त असल्याने महापालिका ठेकेदाराकडेच बस देणार आहे. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीत मनपा केंद्राकडून अनुदानासह मान्यतेच्या प्रतिक्षेत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com