

चांदवड : चांदवडचे माजी आमदार उत्तमबाबा भालेराव यांनी अपक्ष उमेदवार केदा आहेरांना पाठिंबा दिल्याने त्यांचा विजयाचा मार्ग सुकर झाल्याची भावना कार्यकर्त्यांनी येथे झालेल्या मेळाव्यात व्यक्त केली. भालेराव आमदार असताना त्यांनी अनेक लोकोपयोगी कामे केली आहेत. प्रत्येक गावाची खडानखडा माहिती असल्याने त्यांना मानणारा वर्गही मोठा आहे. चांदवड तालुक्यातील विविध राजकीय पक्षातील कार्यकर्ते व सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते केदा आहेरांच्या प्रचारासाठी झोकून देत आहेत. (Keda Aher statement on Chandwad Baba support to Nana in temple will work like servant )