Nashik Lok Sabha Election : इगतपुरी-त्र्यंबकेश्‍वरला 57.8 टक्के मतदान; नवख्या मतदारांचा मतदानाकडे मोठ्या प्रमाणात कल

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी तालुक्यातील २८९ मतदान केंद्रांवर सोमवारी (ता. २०) सकाळपासून मतदारांनी मतदान करण्यासाठी रांगा लावल्या होत्या.
The crowd to vote at the polling station.
The crowd to vote at the polling station.esakal
Updated on

Nashik Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी तालुक्यातील २८९ मतदान केंद्रांवर सोमवारी (ता. २०) सकाळपासून मतदारांनी मतदान करण्यासाठी रांगा लावल्या होत्या. अनेक मतदान केंद्रावर ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांगांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. नवख्या मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसत होता. नवीन मतदारांनी उसुकतेने आपले मतदान केले. ( 57 percent voting in Igatpuri and Trimbakeshwar )

दिवसभराच्या कडाक्याच्या भर उन्हात मतदान करण्यासाठी मतदारला रांगेत उभे राहत मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये सायंकाळी पाचपर्यंत इगतपुरी-त्र्यंबकेश्‍वर मतदारसंघात ५७.८ टक्के मतदान झाले होते. सकाळी ९ पर्यंत अवघे ५ टक्के मतदान झाले होते. मात्र, दुपारी ११ पर्यंत मतदार हळूहळू मतदान करण्यासाठी आल्याने दुपारी १ पर्यंत ३१.०७ टक्के, तर ३ पर्यंत ४४.७७ टक्के मतदान झाले होते. मात्र, दुपारपासून मतदान केंद्रावर भर उन्हात मतदान करण्याकरिता मतदार बाहेर पडले होते.

यावेळी व्यापारी वर्गाने दुपारी आपल्या जेवणाच्या सुट्टीत मतदानाचा हक्क बजावला. दुपारी १ पर्यंत ३३ टक्के मतदान झाले होते. यामध्ये प्रत्येक पक्षाकडून मतदारांसाठी रिक्षाची व चार चाकीची सुविधा करण्यात आली होती. मतदान केंद्रावर बालकांसाठी हिरकणीची तसेच वृद्धांसाठी मतदान केंद्रावर व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली होती. सायंकाळी तीनपासून मतदान केंद्रावर लांबचलांब रांगा लागलेल्या होत्या. यात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून येत होता. (latest marathi news)

The crowd to vote at the polling station.
Nashik Lok Sabha Election: 'भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात पैसे वाटल्याचा व्हिडीओ', उबाठा गटाचा गंभीर आरोप Video Viral

तीनपर्यंत ४४.७७ टक्के मतदान झाले होते. संवेदनशील मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. उन्हाच्या कडाक्यामुळे लवकर मतदान करण्याकडे मतदारांचा कल दिसून आला. तर सायंकाळी पाचपर्यंत ५७.८ टक्के मतदान झाले. यात ६ पर्यंत तालुक्यातील अनेक मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा वाघ व तहसीलदार अभिजित बारवकर मतदान परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.

टिटोली केंद्राला भेट

तालुक्यातील टिटोली येथील पिंक मतदान केंद्र मोठ्या उत्साहात सजवले होते.यामुळे ते तालुक्याचे आकर्षण ठरले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी व नायब तहसीलदार वर्षा वाघ यांनी भेट देत मार्गदर्शन केले. तालुक्यामध्ये अनेक मतदारांचे मतदान यादीत नाव नसल्याने मोठ्या प्रमाणात मतदारांचा हिरमोड झाला.

''गेल्या अनेक वर्षापासून आम्ही मतदान करतो. मात्र, अचानक नाव नसल्याने आम्हाला मतदानासाठी मुकावे लागल्याची चर्चा नाव नसलेल्या मतदारांनी आपली भावना व्यक्त केली. तालुक्यातील सर्व मतदान बुथवर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडली नाही.''- राहुल तसरे, पोलिस निरीक्षक, इगतपुरी

The crowd to vote at the polling station.
Nashik Lok Sabha Election 2024 : नाशिकमध्ये 61 टक्के, तर दिंडोरीत 63 टक्के मतदारांनी बजावला हक्क

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com