नाशिक महापालिकेची १ जुलैपासून प्रत्यक्ष बससेवा सुरू होणार!

NMC bus service
NMC bus service esakal

नाशिक : महापालिकेची बससेवा येत्या १ जुलैपासून सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय शुक्रवारी (ता.११) आढावा बैठकीत झाला. तत्पूर्वी २७ जूनपासून ट्रायल रन म्हणून बस धावतील. त्यासाठी अंतिम तयारी पूर्ण करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिल्या.

(Nashik Municipal Corporation city bus service start from 1 July)

लॉकडाउनमुळे रखडली होती सेवा

महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी आज बससेवा सुरू करण्यासाठी आढावा बैठक घेतली. बैठकीत बससेवा सुरू करण्यासाठीच्या प्राथमिक तयारीला अंतिम रुप देण्याचे निर्देश त्यांनी या वेळी दिले.

नाशिक शहरात राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या सेवेऐवजी महापालिकेने स्वतःची परिवहन सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीची प्राथमिक तयारी अंतिम टप्यांत आहे. मात्र, मध्यंतरी लॉकडाउनमुळे (Lockdown) ही सेवा रखडली होती. अनलॉक (Unlock) झाल्यापासून पुन्हा एकदा बससेवा सुरू करण्याच्या तयारीला सुरवात झाली आहे. त्यानुसार प्रशासकीय अधिकाऱ्यांची आढावा घेतली. पुढील आठवड्यात संचालकांची बैठक होऊन त्याला

NMC bus service
नाशिकला निर्बंध ‘जैसे थे’ राहण्याची शक्यता

ओझर विमानतळ, कसारा रेल्वे स्थानकापर्यंत बससेवा

अंतिम रुप दिले जाणार आहे. महापालिकेच्या बससेवेसाठी डेपो उभारण्याचे काम अंतिम टप्यांत आले आहे. ही कामे पूर्ण करतानाच येत्या २५ जूनपर्यंत बससेवा सुरू करण्यासाठी सगळी तयारी पूर्ण केली जावी. चालकांचे प्रशिक्षण, बसडेपो आणि थांब्याची उभारणी, गणवेश यासह अत्यावश्यक कामकाज पूर्णत्वाला नेण्याचे ठरले. नाशिक रोड व पंचवटी येथील डेपोची कामे पूर्णत्वास नेली जाणार आहे. बससेवा सुरू झाल्यानंतर नियमित सेवेशिवाय पर्यटन वाढीचे नियोजन आहे. त्यात पंचवटी, त्र्यंबकेश्वर, तसेच बोट क्लब, वायनरी यासह पर्यटनस्थळावर जाण्यासाठी बससेवेतील काही बस सुरू केल्या जाणार आहेत.

''शहरातील बससेवेच्या कामकाजाचा आढावा घेऊन भविष्यात ओझर विमानतळ (Ozar Airport), कसारा रेल्वे स्थानकापर्यंत शहर बससेवा सुरू करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे.''-कैलास जाधव, आयुक्त, नाशिक महापालिका

(Nashik Municipal Corporation city bus service start from 1 July)

NMC bus service
राजमुद्रा चिन्हासह शासनलिखित लेसची सर्रास विक्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com