Nashik News : दुचाकीच्या धडकेत दोघे ठार

Death news
Death news esakal

सोग्रस (जि. नाशिक ) : भरधाव जात असलेल्या वाहनाने दुचाकीस दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोन युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रविवारी (ता.२९) रात्री ही घटना घडली.

ऋषिकेश सोनवणे (वय २७) व स्वप्नील व्यवहारे (वय २८, दोघे, रा. चांदवड) हे दुचाकी (एमएच १५ सीझेड ०६३३) वरून मालेगाव कडून चांदवड कडे येत होते.

हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

दोघे आहेर वस्ती जवळ आले असताना भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या धडकेने दोघेही गंभीर जखमी झाले. जखमींना तत्काळ रुग्णवाहिकेद्वारे चांदवड उपजिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले.

चांदवड उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोघांना तपासून मयत म्हणून घोषित केले. याप्रकरणी चांदवड तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

Death news
Nashik News : शॉर्टसर्किटमुळे घरगुती सामान जळून खाक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com