नाशिक : तब्बल २८०० कोटींपर्यंत दायित्वाचा भार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik Municipal Corporation Election

नाशिक : तब्बल २८०० कोटींपर्यंत दायित्वाचा भार

नाशिक : महापालिका निवडणुकीच्या (Nashik Municipal Corporation Election) पार्श्वभूमीवर यंदाच्या आर्थिक वर्षात विकासकामांचा बार उडविताना पुढील वर्षासाठीदेखील कुठलीच कामे न ठेवल्याने नव्याने निवडून येणाऱ्या नगरसेवकांना विकासकामांसाठी निधी शिल्लक राहतो की नाही, अशी शक्यता वर्तविली जात आहे. तब्बल २८०० कोटी रुपयांपर्यंत दायित्वाचा भार पोचल्याने आधीचीच देणी मिटविण्यात लेखा विभागाला कसरत करावी लागणार आहे.

हेही वाचा: शिर्डीत कोविड रुग्णालय सुरू करा : लोखंडे

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चालू आर्थिक वर्षात मोठ्या प्रमाणात कामे करण्यात आली. त्यात महत्त्वाच्या कामांमध्ये अडीचशे कोटी रुपयांचे दोन उड्डाणपूल, ४१४ कोटी रुपयांचे रस्ते, ३५४ कोटी रुपयांच्या घंटागाडीचा ठेका, ७५ कोटी रुपये सफाई कर्मचारी ठेका, ३५ ते ४५ कोटी रुपये बससेवेसाठी आदी महत्त्वाच्या योजनांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर नुकतेच बांधकाम विभागाने जवळपास पावणेदोनशे कोटी रुपयांच्या कामांच्या निविदा जाहीर केल्या आहेत. महापालिकेला प्राप्त होणाऱ्या उत्पन्नात ही कामे शक्य असली तरी महापालिकेचे उत्पन्न कमालीचे घटले आहे. जवळपास ४०० कोटी रुपयांची तूट अंदाजपत्रकात आली आहे. त्यामुळे पुढील वर्षाच्या अंदाजपत्रकावर त्याचा परिणाम दिसून येत आहे. या दरम्यान जवळपास २८०० कोटी रुपयांचा दायित्वाचा भार महापालिकेवर पडणार आहे. त्यातून नवीन निवडून येणाऱ्या नगरसेवकांना विकासकामांसाठी निधी शिल्लक राहणार नसल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा: ऑनलाइन शिक्षणापेक्षा देशी दारूचा परवाना द्या

आगाऊ खर्चात सारेच सहभागी

पुढील वर्षाच्या अंदाजपत्रकातील भांडवली कामांचा खर्च या वर्षीच करण्यात आला आहे. त्यामुळे पुढील वर्षभरात विकासकामांसाठी निधी शिल्लक राहणार नाही. विशेष म्हणजे जवळपास सर्वच नगरसेवकांच्या म्हणजे सर्व पक्षाचा एकत्रित निधी खर्च करण्यात सहभाग आहे. सत्ताधारी भाजपला विरोधकांना दुखवायचे नव्हते. विरोधकांनादेखील पंचवार्षिक मधील शेवटचे वर्षे असल्याने विकासकामांसाठी निधी पदरात पाडून घ्यायचा असल्याने विरोध करायचा नव्हता. परंतु, यातून महापालिकेवर दायित्वाचा भार मात्र वाढला. स्थायी समितीच्या पुढील बैठकीत सुधारित अंदाजपत्रक सादर केले जाणार आहे. त्यातून दायित्वाची आकडेवारी बाहेर पडण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nashik
loading image
go to top