खासगी वाहतुकीला अच्छे दिन | Nashik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाशिक : खासगी वाहतुकीला अच्छे दिन

नाशिक : खासगी वाहतुकीला अच्छे दिन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : राज्य परिवहन महामंडळाचे सर्व कर्मचारी संपावर गेल्यामुळे एसटी बसचे चाक थांबले आहे. त्यामुळे खासगी वाहतुकीला अच्छे दिन आले आहेत. या खासगी अवैध वाहतूककडे पोलिस प्रशासनाने सुद्धा दुर्लक्ष केले असून, ते एकप्रकारे या वाहतुकीला प्रोत्साहनच देत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र, सर्वसामान्य प्रवाशांचे हाल आणि आर्थिक पिळवणूक होत असल्यामुळे कर्मचाऱ्यांचा संप शासनाने तत्काळ मिटवावा, अशी मागणी जनतेतून केली जात आहे.

हेही वाचा: सांगली : एसटीचे चाक थांबले; प्रवाशांचे हाल

एसटी कर्मचारी संपावर असल्याने खासगी गाड्या वाल्यांनी त्यांचे दर अव्वाच्या सव्वा वाढवले असून, ते प्रवाशांची आर्थिक लूट करीत आहेत. हा सर्व प्रकार वाहतूक पोलिस प्रशासन निमूटपणे पाहून दुर्लक्ष करीत असल्यामुळे खाजगी वाहतूक आणि पोलिस प्रशासनाचे मधूर संबंध दिसून येत आहेत. गरीब लोकांचे येण्या जाण्यासाठी हाल होत आहेत. भाऊबीजेला घरी आलेल्या बहिणी त्यांच्या घरी जाण्यासाठी संप मिटण्याची वाट पाहत आहेत. मिळेल त्या वाहनाने प्रवास करून घरी जात आहेत. येथील जुन्या बस्टँडवर पोलिस स्टेशनच्या समोर प्रवाशांची गर्दीच गर्दी पाहायला मिळत आहे.

एकही पोलिस कर्मचारी या गर्दीकडे दिवसभर फिरकत नाही किंवा वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत नाही. याच कारणामुळे दिवसातून अनेक वेळा वाहतूकीची कोंडी होताना दिसत आहे. हा सर्व प्रकार पोलिस स्टेशनच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होत आहे. सूज्ञ लोक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. मालेगाव शहरात मुख्य मार्गावर जड वाहने सर्रास पार्किंग केली जात असल्यानेही वाहतुकीच्या कोंडीला हातभार लागून अपघाताला निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने परिवहन महामंडळाचा संप मिटेपर्यंत खासगी वाहतुकीवर व अवैध वाहतुकीवर अंकुश ठेवावा, अशी मागणी लोकातून केली जाता आहे.

हेही वाचा: एसटीच्या गाड्यांना संपाचा ब्रेक, चाक जागेवरच थांबले

शासनाने तडजोड करून संप मिटवावा

पोलिस गावाबाहेर अवैध व इतर वाहने तपासतात, तसे गावातील गर्दीच्या ठिकाणी लक्ष का देत नाही व त्यावर ते अंकुश का ठेवत नाहीत, असा प्रश्न सुज्ञ लोकांतून उपस्थित केला जात आहे. शासनाने तडजोड करून महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप मिटवावा, अशी मागणी माहेरी आलेल्या बहिणी सुद्धा करीत आहेत.

loading image
go to top