
नाशिक : कामात गुणवत्ता नसेल, तर कारवाई अटळ
नाशिक : कामात कडकपणे गुणवत्ता तपासली जाईल. त्यामुळे गुणवत्ता नियंत्रणविषयक नियम कायदे समजून घ्या. भविष्यात नियमच माहिती नाही. कारवाईत शिथिल करा, हे ऐकून घेतले जाणार नाही. अशा शब्दात महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी ठेकेदारांची बैठक घेऊन कामाच्या गुणवत्तेविषयी पूर्वकल्पना दिली. श्री. पवार यांनी महापालिकेचे अधिकारी आणि ठेकेदारांची बैठक घेतली. एका बाजूला अधिकारी दुसऱ्या बाजूला ठेकेदार अशा दोन्ही बाजूला समोरासमोर झालेल्या एकत्रित बैठकीत श्री. पवार यांनी कामाच्या गुणवत्ताविषयक नियम, कायदे आणि निकषांबाबत गंभीर असल्याचे स्पष्ट शब्दात समज दिली.
श्री. पवार म्हणाले, की शहरात दौरे करीत आहे. रस्त्यांच्या कामांत मधोमध असलेले चेंबर खड्ड्यात गेलेले आहेत. रस्त्यांच्या लगत नियमानुसार पाथ होल नाही. चेंबरचे पावसाळी पाणी जाण्याचे नाले बुजले आहेत. काही ठिकाणी चेंबरचे होल बुजले आहेत. रस्त्याच्या दोन्ही कडेला पांढरे पट्टे असावेत. गतिरोधक कसे असावेत, याचे नियम आहे. बेढब स्वरूपाचे कसे तरी ते टाकलेले असतात. अशा अनेक कामात गुणवत्ता पाळली गेल्याचे दिसत नाही. त्यामुळे भविष्यात जी कामे होतील. ती गुणवत्तेशी तडजोड करून होणार नाहीत. गुणवत्तेशी तडजोड दिसल्यास तेथे हमखास कारवाई होईल, याची ठेकेदार आणि अधिकारी अशा दोघांनी काळजी घ्यावी.
ठेकेदार तुरुंगात
कामाची गुणवत्ता राखली गेली नाही म्हणून मुंबईत काही ठेकेदारांना थेट सहा सहा महिने तुरुंगात जावे लागले. त्यात अनेक कामांचे अनुभव असलेले नामांकित ठेकेदारही होते. तसे केवळ गुणवत्ता नियंत्रणविषयक नियम कायदेच माहिती नसलेले अनेक जण होते. मात्र, चौकशीत दोषी आढळल्याने संबधितांवर कारवाई झाली. माहिती नसल्याने त्यांना कारवाईचा सामना करावा लागला. त्यामुळे यापुढे नियम, कायदे समजून घेऊन त्यानुसार गुणवत्तापूर्ण कामेच नाशिकला होतील. याबाबत गंभीर रहा, अशा सूचना श्री. पवार यांनी दिल्या.
Web Title: Nashik Ramesh Pawar Instruction To Officer Contractor Meeting
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..