Nashik Rangpanchami 2023 : रंग बरसे भीगी चुनरिया... सुरात शॉवर रंगोत्सवात रंगांची उधळण! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nashik rang panchami 2023 Citizens enjoy shower color festival nashik news

Nashik Rangpanchami 2023 : रंग बरसे भीगी चुनरिया... सुरात शॉवर रंगोत्सवात रंगांची उधळण!

जुने नाशिक : शहराच्या विविध भागात विशेषता जुने नाशिक परिसरात शॉवर रंगोत्सवाचा (Nashik Rangpanchami 2023) नागरिकांनी मनमुराद आनंद घेतला.' रंग बरसे भीगी चुनरिया... सुरात शॉवर रंगोत्सवात रंगप्रेमी न्हावून निघाले होते. (nashik rang panchami 2023 Citizens enjoy shower color festival nashik news)

डीजेच्या दणदणानात नृत्याचा ठेका धरत तरुण-तरुणींनी रंगपंचमी उत्साहात साजरी केली.रंगपंचमी साजरी करण्याची परंपरा शहरवासीयांनी टिकून ठेवली आहे. मोठ्या जल्लोषात रंगपंचमी साजरी केली जात असते.

गेली दोन वर्ष कमी अधिक प्रमाणात कोरोना प्रादुर्भावाचे निर्बंध असल्याने रंगोत्सवावर देखील काहीसे निर्बंध लादण्यात आले होते. यंदा मात्र कुठल्याही प्रकारची निर्बंध नसल्याने रंगोत्सवाचा नागरिकांनी मनसोक्त आनंद घेतला.

ठिकठिकाणी डीजेच्या तालावर रंगोत्सव रंगला. रंगपंचमी म्हटली की जुने नाशिक परिसरावर संपूर्ण शहराचे लक्ष लागून असते. त्यानिमित्ताने यावर्षीही मोठ्या उत्साहात रंगपंचमी साजरी करत रंगोत्सवाचे आयोजन करण्यात आले. केवळ जुने नाशिकमध्ये चार रहाडी आणि बारा शॉवरचे रंगोत्सवासाठी आयोजन करण्यात आले होते.

प्रत्येक शॉवरच्या ठिकाणी एका वेळेस शेकडो रंगप्रेमी रंग खेळण्याचा आनंद घेतल्याचे चित्र दिसून आले. मेनरोड, दहिफुल, बादशाही कॉर्नर, साक्षी गणपती परिसर, भद्रकाली मार्केट, सोमवार पेठ अशा विविध भागांसह संपूर्ण जुने नाशिक परिसर रंगांनी न्हावून निघाला होता.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

शॉवरमध्ये रंगपंचमी साजरी करण्याचा आनंद अधिक तर महाविद्यालयीन तरुण-तरुणी घेताना दिसले. लाल, गुलाबी,पिवळा अशा विविध रंगांची उधळण यावेळी झाली. शहर जिल्ह्यातील रंगप्रेमीं शॉवर रंगोत्सचा आनंद घेतला. यंदा सर्वाधिक शॉवर रंगोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

याठिकाणी होते शॉवर रंगोत्सव

श्री प्रसाद युवक मित्र मंडळ गुलालवाडी शॉवर

नवजीवन मित्र मंडळ भद्रकाली कारंजा शॉवर

गजानन महाराज मित्र मंडळ कानडे मारुती लेन शॉवर

वेलकम सहकार्य मित्र मंडळ सोमवार पेठ शॉवर

भद्रकाली युवक मित्र मंडळ राजेंद्र भावरे चौक शॉवर

शिवसेवा मित्र मंडळ गाडगे महाराज पुतळा शॉवर

नेहरू चौक मित्र मंडळ पिंपळपार रंगोत्सव

राजमुद्रा मित्र मंडळ हुंडीवाला लेन शॉवर

छत्रपती शिवाजी महाराजरोड मित्र मंडळ वावरलेन शॉवर

प्रेरणा सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ मेनरोड शॉवर

शिवाजी तरुण मित्र मंडळ कथडा शिवाजी चौक शॉवर

न्यू एकता फ्रेंड सर्कल मंडळ मिरजकर लेन बुधवार पेठ

केवळ महिलांसाठी

बुधवार पेठ येथील मिरजकर लेन भागात न्यू एकता फ्रेंड सर्कल मंडळातर्फे केवळ महिलांसाठी शॉवर रंगोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी पुरुषांना प्रवेश बंदी होती. त्यामुळे जुने नाशिक परिसरासह अन्य भागातील महिलांनी निसंकोच शॉवर रंगोत्सवात रंगपंचमी खेळण्याचा आनंद घेतला. यावेळी रंग खेळणाऱ्या महिलांच्या चेहऱ्यावर रंगपंचमी खेळण्याच्या आनंदाचा रंग निखरून दिसत होता.

डीजे बंदी नावालाच

रंगोत्सवाचे आयोजन करताना पारंपारिक वाद्यांचा वापर करावा. डीजेला परवानगी नसल्याचे स्पष्ट आदेश पोलिसांकडून आयोजकांना देण्यात आले होते. आयोजकांनीही ते मान्य केले होते. प्रत्यक्षात मात्र रंगोत्सवाच्या दिवशी सर्वच ठिकाणी डीजेचा दणदणात ऐकावास मिळाला. पोलिसांचे आदेश जुगारून सर्वांनी डीजेच्या सुरात रंगोत्सव साजरा केला. रविवारची सुट्टी असल्याने रंगोत्सवात रंग खेळणाऱ्या रंगप्रेमींची अधिकच भर यानिमित्ताने दिसून आली.