Maharashtra Premier League: महाराष्ट्र प्रीमियर लिगमध्ये नाशिकचे सत्यजित, मुर्तझा, यासर, शर्विन, साहिल!

Satyajit Bachhav, Murtaza Trunkwala, Yasser Shaikh, Sharwin Kiswe, Sahil Parkh
Satyajit Bachhav, Murtaza Trunkwala, Yasser Shaikh, Sharwin Kiswe, Sahil Parkhesakal

Maharashtra Premier League : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय एमपीएल अर्थात महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेसाठी नाशिकच्या सत्यजित बच्छाव, मुर्तझा ट्रंकवाला, यासर शेख, शर्विन किसवे, साहिल पारख या खेळाडूंची विविध संघांत निवड झाली आहे. (Nashik Satyajit Murtaza Yasser Sharwin Sahil selected in Maharashtra Premier League nashik news)

आयपीएलच्या धर्तीवर झालेल्या लिलावावेळी सहा संघांची नावेही जाहीर करण्यात आली. सुहाना मसालेवालेंचा पुणे संघ पुणेरी बाप्पा नावाने ओळखला जाईल. ऋतुराज गायकवाड हा या संघाचा आयकॉन खेळाडू असेल.

पुनीत बाल समूहाचा संघ कोल्हापूर टस्कर्स, ईगल इन्फ्रा इंडियाचा संघ ईगल नाशिक टायटन्स, वेंकटेश्वरा इंडस्ट्रीजचा संघ छत्रपती संभाजी किंग्ज, जेटस सिंथेसिसचा संघ रत्नागिरी जेटस, कपिल सन्सचा संघ सोलापूर रॉयल्स अशा नावाने ओळखला जाईल.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Satyajit Bachhav, Murtaza Trunkwala, Yasser Shaikh, Sharwin Kiswe, Sahil Parkh
Asia Cricket Cup 2023 : आशिया क्रिकेट कप स्पर्धेचा निर्णय रविवारी; अहमदाबादमध्ये आशियाई परिषदेची बैठक

सोलापूर रॉयल्सने सत्यजित बच्छावला ३ लाख ६० हजार रुपयांना खरेदी केले. मुर्तझा ट्रंकवालाला छत्रपती संभाजी किंग्जने १ लाख ८० हजार रुपयांना, ईगल नाशिक टायटन्सने साहिल पारखला ६० हजार रुपयांमध्ये, ईगल नाशिक टायटन्सनेच शर्विन किसवेला तर यासर शेखलाही सोलापूर रॉयल्सने खरेदी केले आहे.

एमपीएल स्पर्धेचे सामने वरील ६ संघांत १५ ते २९ जून दरम्यान महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहेत. या राज्यस्तरीय एमपीएल स्पर्धेतील निवडीबद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.

Satyajit Bachhav, Murtaza Trunkwala, Yasser Shaikh, Sharwin Kiswe, Sahil Parkh
Cricket : लग्नामुळे कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना खेळू शकणार नाही ; ऋतुराज गायकवाड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com