Nashik : स्वामी सागरानंद सरस्वती यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik news

Nashik : स्वामी सागरानंद सरस्वती यांचे निधन

त्र्यंबकेश्वर : अखिल भारतीय षड्दर्शन आघाड्याचे(महाराष्ट्र) प्रमुख स्वामी सागरानंद सरस्वती यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांचे वय शंभरी पर्यंत होते. असे आघाड्याच्या वतीने सांगण्यात आले.

हेही वाचा: Nashik : गुणवत्ता विभागाची अशीही Adjustment; चेंबरच्या प्लास्टरमधूनही हातचलाखी

त्यांचा मनमिळाऊ स्वभावामुळे ते आबालवृद्धांमध्ये परिचित होते. सन १९८९ पासुन कुंभमेळा व त्याचे महत्व यासाठी त्यांनी आखाडा परिषद महाराष्टात स्थापन करुन क्षेत्राचे धार्मिक महत्व व परंपरा अव्याहतपणे टिकुन रहातील यासाठी अविरत प्रयत्न केले.

हेही वाचा: Nashik Accident : नाशिकमध्ये बसला भीषण आग; 8 ते 10 प्रवाशांचा होरपळून मृत्यू

त्यांनी कुंभमेळा कालावधीत आखाड्यांच्या होणार्या वादावर नेहमी तोडगा काढून सामोपचाराने वाद मिटविल्याने त्यांची सर्व भारतीय आखाड्यात विशेष महती होती. धार्मिक अभ्यास व आयुर्वेद अभ्यासामुळे त्यांनी रुग्णांवर मोफत उपचार केल्याने अनेक रुग्ण रोगमुक्त झाले आहेत. त्यांची मोठी श्रध्दा महंत सागरानंद स्वामींची वर आहे.

हेही वाचा: Nashik Bus Accident: बस अपघातावरुन नाना पटोलेंचा सरकारवर निशाणा

त्रंबकेश्वर क्षेत्रासह विविध तीर्थ क्षेत्रावर त्यांना त्यांच्या कर्तृत्वामुळे मान होता. भारतातील मोठमोठ्या क्षेत्रावर त्यांनी यज्ञयाग व मुर्ती प्रतिष्ठित सहभाग घेतला होता. त्यांचे राजकीय व धार्मिक क्षेत्रात मोठया स्वरुपात अनुयायी व शिष्य आहेत. मोठ्या पदावर असुनही नम्र स्वभावामुळे त्यांची सर्वांनाच आदरयुक्त भिती असे. एक महिन्या पासुन स्वामीजी आजारी होते. आज रिंग रोड येथील आनंद आखाड्यात दुपारी चार वाजता समाधी देण्यात येणार आहे.त्यांचा मनमिळाऊ स्वभावामुळे ते आबालवृद्धांमध्ये परिचित होते. सन १९८९ पासुन कुंभमेळा व त्याचे महत्व या साठी त्यांनी आखाडा परिषद महाराष्टात स्थापन करुन क्षेत्राचे धार्मिक महत्व व परंपरा अव्याहतपणे टिकुन रहातील या साठी अविरत प्रयत्न केले.

टॅग्स :NashikKumbh Meladeathdead