नाशिक : गोदापात्रात अनधिकृत बांधकाम

मनसेचे नगरसेवक शेख यांची जलसंपदामंत्र्यांकडे तक्रार
Nashik the Godapatra Unauthorized buildings Construction
Nashik the Godapatra Unauthorized buildings Constructionsakal

नाशिक : आनंदवली शिवारातील सर्व्हे क्रमांक ६५ मधील अनधिकृत बांधकामासंदर्भात स्थायी समितीच्या सभेत दावे-प्रतिदावे रंगल्यानंतर आता शासनाकडे तक्रार करण्यात आली आहे. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे मनसेचे नगरसेवक सलीम शेख यांनी लेखी तक्रार केली असून, प्रशासनाकडून प्रकरण दाबले जात असल्याचा आरोप पत्रात केला आहे.

Nashik the Godapatra Unauthorized buildings Construction
फोनची स्क्रिन ठरवते आपला मूड ते राज्यात पुन्हा निर्बंध लागण्याची शक्यता

आनंदवली शिवारात गोदावरी नदीपात्रात उभारलेल्या अनधिकृत बांधकामावरून नगरसेवक सलीम शेख यांनी नगररचना विभागाला लक्ष्य केले आहे. गोदावरी नदीपात्रात बांधकाम सुरू असल्याने पुराचा धोका निर्माण होत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. या संदर्भात स्थायी समितीच्या सभेत प्रत्यक्ष जागेवर जाऊन चौकशीची मागणी त्यांनी केली होती.

दुसऱ्या सभेत कागदावर बांधकाम नियमित दिसत असले, तरी प्रत्यक्ष जागेवर चुकीचे बांधकाम होत असल्याचे निदर्शनास आणले. सुधाकर बडगुजर यांनीही दुजोरा देत गोदा पार्कची पाच फूट जमीन शिल्लक राहिली नसल्याचा आरोप केला होता. बांधकाम परवानगी नियमानुसारच केली असून, पी.टी. शिटची तपासणी केल्याचा दावा नगररचना विभागाने केला.

Nashik the Godapatra Unauthorized buildings Construction
राज्यात आज मध्यरात्रीपासून नवे निर्बंध लागू; अनिल परबांची घोषणा

पी.टी. शिटनुसार नदीपात्र व प्रत्यक्ष बांधकाम या दोन्हीच्या मध्ये १४०० चौरसमीटर क्षेत्र गोदापात्रासाठी संपादित करण्यात आले. मात्र, हे क्षेत्र प्रत्यक्ष अस्तित्वात नसून बांधकाम थेट नदीपात्रात होत असल्यामुळे गोदापात्रासाठी आरक्षित केलेले क्षेत्र गेले कुठे, असा सवाल केला.

नगररचना विभागाचे उपअभियंता संजय अग्रवाल यांच्या बदलीची मागणीही त्यांनी केली होती. स्थायी समिती सभापती गणेश गिते यांनी या प्रकरणात आयुक्त कैलास जाधव यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असा निर्णय दिला. मात्र, शुक्रवारी (ता. २४) थेट जलसंपदामंत्र्यांशी पत्रव्यवहार करताना प्रशासनाकडून नगररचना विभागाला पाठीशी घातले जात असल्याचा आरोप शेख यांनी केला. नदीपात्रात बांधकाम परवानगी कशी दिली, असा सवाल करताना शेख यांनी पूरस्थिती निर्माण होऊन हानी होण्याची भीती व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com