जमावबंदी, कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पंचवीस तरुणांवर कारवाई

Corona rules on Action
Corona rules on Actionsakal

जुने नाशिक : जमावबंदी आणि कोरोना नियमांचे(Corona rules) उल्लंघन करत इमारतीच्या गच्चीवर गोंधळ करत पतंगबाजी करण्याऱ्या २५ जणांना भद्रकाली गुन्हे शोध पथकाने डीजेसह ताब्यात घेतले. महात्मा गांधी रोडवरील छत्रपती शिवाजी स्टेडिअम (Chhatrapati Shivaji stadium) कॉम्प्लेक्स इमारत २ च्या गच्चीवर काही तरुण मंडळी एकत्र जमून डीजेच्या आवाजात गोंधळ घालत पतंगबाजी करत होते. नियंत्रण कक्षाकडून पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली.

Corona rules on Action
एकतर्फी बदल अमान्य : लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे

वरिष्ठ निरीक्षक दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, राजेंद्र निकम, संदीप शेळके, रमेश कोळी, उत्तम खरपडे, विशाल काठे आदी घटनास्थळी दाखल झाले. वीस ते पंचवीस जण डीजेच्या जोरदार आवाजात धिंगाणा करताना आढळले. पथकाने त्यांच्यावर कारवाई करत ताब्यात घेतले. किरण सुखलाल केवर (२१, रा. हनुमानवाडी, पंचवटी), विकी सुभाष धोत्रे (१९, रा. पेठ रोड), जय जनार्दन देवगावकर (२३, रा. नवनाथनगर), सुलतान बाबू शेख (२३, रा. भारतनगर, वडाळा रोड), विजय बाळासाहेब ताडगे (२६, रा. हनुमानवाडी), लखन वसंत गवळी (२५, रा. पंचवटी), महेश दिलीप कर्पे (२६, रा. शांतिनगर), जितेंद्र भगवान काळे (२९, रा. रविवार कारंजा), निखिल कैलास भालेराव(२३, रा. देवळाली गाव), समीर जमील शेख ( २०, रा. देवळाली गाव), अक्षय रामपाल लोट (२२, रा. महालक्ष्मी चाळ, वडाळा नाका), पवन अशोक लोट (२६, रा. वडाळा नाका), धीरज निवृत्ती पालाजी ( २०, रा. देवळाली राजवाडा), इंदर संजय पवार (१९, रा. देवळाली गाव राजवाडा), गिरीश ज्ञानेश्वर भालेराव (१९, रा. नाशिक रोड), प्रतीक अनिल भालेराव( १९, रा. नाशिक रोड), गौरव अनिल दळवी (२५, रा. रविवार कारंजा), प्रतीक संतोष कोठुळे (२१, रा. दत्तनगर, पेठ रोड), अभिषेक संतोष आढळकर ( १९, रा. मखमलाबाद नाका), नितीन सुभाष विसपुते (२७, रा. म्हसरूळ), आकाश दिलीप दोडे (२२, रा. म्हसरूळ), आकाश किरण काळे (२४, रा. दिंडोरी रोड), कृष्णा मधुकर जाधव (२३, रा. पोलिस मुख्यालय) अल्ताफ ऊर्फ रिम्मी नजीर शेख (रा. वडाळा नाका), भूषण अशोक वाघ (१९, रा. देवळाली गाव), असे ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. यात एका पोलिस कर्मचाऱ्याच्या मुलाचा समावेश आहे. पोलिस कर्मचारी श्री. काठे यांच्या तक्रारीवरून भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com