

नाशिक : विधानसभा निवडणुकीमध्ये जागावाटपावरून महाविकास आघाडीमध्ये तिढा निर्माण झाल्याने अनेक जागांवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष ठाम होता. काँग्रेसदेखील काही जागांवर आपले उमेदवार देण्यावर ठाम होती. यातून जिल्ह्यातील नाशिक मध्य, चांदवड-देवळा मतदारसंघात बंडखोरी करून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अर्ज दाखल केले. मात्र, आता काँग्रेस उमेदवार मागे घेण्याच्या तयारीत असल्याचे सूतोवाच पक्षाकडून करण्यात आले. (vidhan sabha election Insurgents in Congress are trying to withdraw from party )