Nashik News : कुत्र्याला पोळ्या दिल्या नागरिकांनी केली महिलांना मारहाण

crime news
crime newsesakal

पंचवटी : हिरावाडी रोडवरील लाटे नगर परिसरातील दोन महिला भटक्या कुत्र्यांना पोळ्या देत असल्याने हे कुत्रे नागरिकांना चावत असल्याचा आरोप करीत स्थानिकांनी तिला व तिच्या मुलीला मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेबाबत पंचवटी पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

crime news
Dada Bhuse : सर्वपक्षीय नेते का करताय मंत्री दादा भुसेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी; सविस्तर जाणून घ्या

याबाबत माहिती अशी की, हिरावाडीतील लाटे नगर येथे वास्तव्यास असलेल्या राहणाऱ्या दोन महिला ५ ते ६ मोकाट कुत्र्यांना सार्वजनिक ठिकाणी बिस्किटे आणि खाद्यपदार्थ खाऊ घालत असतात. यामुळे परिसरातील नागरिक व या दोन महिलांमध्ये नेहमी शाब्दिक चकमक होत असे. या मोकाट कुत्र्यांनी दोन- तीन मुलांना चावा घेतला. यावरून स्थानिकांच्या जमाव व दोन महिलांमध्ये वाद झाला. वादाचे पर्यवसान हे हाणामारीत झाले.

crime news
Nashik News : हिरावाडीत मोकाट भटक्या कुत्र्याचा 3 जणांना चावा; बंदोबस्त करण्याची मागणी

याप्रकरणी या दोन महिलांना जमावाने मारहाण व विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे, तर स्थानिकांमधील एका महिलेने या दोन महिलांविरुद्ध पाळीव कुत्र्याने चावा घेतला म्हणून व सार्वजनिक ठिकाणी लघवी आणि विष्ठेतून आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला असल्याबाबतचा गुन्हा दाखल केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com