Nashik ZP News: अभ्यास करा अन्यथा कारवाईचा बडगा; ZP CEOच्या परिक्षेत नापास झालेल्या 30 जणांना नोटीसा | Nashik ZP News Study or face action Notice to 30 failed in ZP CEO exam | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ZP CEO Ashima Mittal, Nashik News

Nashik ZP News: अभ्यास करा अन्यथा कारवाईचा बडगा; ZP CEOच्या परिक्षेत नापास झालेल्या 30 जणांना नोटीसा

Nashik ZP News : जिल्हा परिषदेच्या मुख्यालयासह तालुकानिहाय पंचायत समित्यांमधील कनिष्ठ प्रशासन अधिकारी व सहाय्यक प्रशासन अधिकारी यांची मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी घेतलेल्या लेखी परीक्षेत तब्बल ४० टक्के अधिकारी नापास झाले होते.

या ३० कनिष्ठ व सहाय्यक प्रशासन अधिका-यांना नोटीसा बजाविण्यात आल्या आहे. यात १५ दिवसांनी पुन्हा परीक्षा घेतली जाणार असून यात नापास ठरल्यास त्यावर कारवाई केली जाईल असा इशारा नोटीसीत दिल्याचे समजते. त्यामुळे या अधिका-यांना परीक्षेत पास होण्यासाठी अभ्यास करावा लागणार आहे. (Nashik ZP News Study or face action Notice to 30 failed in ZP CEO exam)

कळवण, दिंडोरी, सुरगाणा, इगतपुरी, सिन्नर यासह मालेगाव तालुक्यातील पंचायत समित्यांमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी बैठका घेतल्या असता यात, पंचायत समित्यांमधील कनिष्ठ प्रशासन अधिकारी व सहाय्यक प्रशासन अधिकारी यांचे कामकाज असमाधानकारक आढळून आले होते.

त्यावर, मित्तल यांनी गत आठवडयात मुख्यालयातील तसेच प्रत्येक पंचायत समितीमधील कनिष्ठ व सहाय्यक प्रशासन अधिकारी यांची बैठक घेतली होती. बैठकीत अचानकपणे प्रशासकीय कामकाजाची अधिकारींना किती माहिती आहे हे जाणून घेण्यासाठी मित्तल यांनी उपस्थितीत अधिका-यांची परीक्षा घेतली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

यात १५ सहाय्यक प्रशासन अधिकारी तर, ३६ प्रशासन अधिकारी यांनी ६० मार्कची परीक्षा दिली. त्यात तब्बल ४० टक्के अधिकाऱ्यांना कमी गुण म्हणजे अगदी १० ते १५ दरम्यान गुण प्राप्त झाल्याने ते नापास झाले.

कमी मार्क प्राप्त झालेल्या अशा ३० अधिका-यांना प्रशासनाने नोटीसा बजाविल्या असल्याचे समजते. नोटीसांमध्ये परिक्षेत कमी मार्क प्राप्त झाले असल्याने मित्तल यांनी खुली नाराजी व्यक्त केली आहे. कारवाईच्या भितीने अधिका-यांचे धाबे दणाणले आहे.

टॅग्स :NashikZP