Kalwan News : कळवण तालुक्यात नैसर्गिक शेती कार्यशाळा; शेतकरी बांधवांनी उपस्थित राहण्याचे कृषी विभागाचे आवाहन | agriculture workshop in Kalwan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kalwan agriculture workshop News

Kalwan News: कळवण तालुक्यात नैसर्गिक शेती कार्यशाळा; शेतकरी बांधवांनी उपस्थित राहण्याचे कृषी विभागाचे आवाहन

कळवण (जि. नाशिक) : कळवण तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना कळविण्यात येते, की बदलत्या युगात शेती व्यवसाय व शेती उत्पादने ही हायब्रीड, केमिकल व विषयुक्त‍ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना विषयुक्त‍ अन्न‍ तर मिळत आहे, तसेच जमिनीचा दर्जासुद्धा या रासायनिक खते, औषंधामुळे खालावत चालला आहे.

म्हणून शेती उत्पन्नातसुद्ध घट होत आहे. तसेच त्याचा मानवी आरोग्यावरसुद्ध परिणाम होत आहे. (Natural Farming Workshop in Kalwan Taluka Agriculture Department appeals to farmers to attend nashik news)

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

शेतकरी हा सेंद्रिय शेतीकडे वळू लागला आहे. परंतु त्याविषयी शेतकऱ्यांना पुरेशी माहिती उपलब्ध‍ होत नसल्याने आमदार नितीन पवार यांच्या संकल्प्‍नेतून ए. टी. पवार इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट फाउंडेशन व कळवण तालुका कृषी विभाग यांच्या संयुक्त‍ विद्यमाने राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित सेंद्रिय व विषमुक्त शेतीचे प्रणेते व अभिनव फार्मर्स क्लबचे अध्यक्ष ज्ञानेश्वर बोडके (मुळशी, पुणे) यांचे एकात्मिक सेंद्रिय शेती आणि थेट विक्री या विषयावर मार्गदर्शन, तसेच सेंद्रिय शेती कार्यशाळेचे आयोजन लोकनेते ए. टी. पवार (दादासाहेब) सांस्कृतिक सभागृह, दळवट येथे मंगळवारी (ता. २८) सकाळी दहाला करण्यात आले आहे.

आमदार नितीन पवार यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्‍घाटन होणार आहे. ज्ञानेश्वर बोडके ‘एकात्मिक सेंद्रिय शेती आणि थेट विक्री’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

तसेच प्रमुख पाहुणे विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ,सहा. जिल्हाधिकारी तथा प्रकल्प‍ अधिकारी कळवण विशाल नरवाडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नाशिक विवेक सोनवणे, प्रकल्प संचालक आत्मा नाशिक राजेंद्र निकम, उपविभागीय कृषी अधिकारी कळवण राकेश वाणी, गृह विज्ञान तज्ज्ञ अर्चना देशमुख हे मान्य्वर उपस्थित राहणार आहेत.

तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव, फार्मर प्रोडयुसर कंपनी, महिला बचतगट यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नैसर्गिक शेती कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ए. टी. पवार इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट फाउंडेशनचे अध्यक्ष ऋषीकेश पवार व तालुका कृषी अधिकारी मिनल म्हस्के यांनी केले आहे.