Navratrotsav 2022 : सांडव्यावरील श्री जगदंबामाता मूर्तीचे संवर्धन

Sandvyavarchi Devi Idol
Sandvyavarchi Devi Idolesakal

नाशिक : सांडव्यावरील श्री जगदंबामाता देवीची मूर्ती वीर आसनातील आहे. सुमारे पावणेतीनशे वर्षांपूर्वी नारोशंकर राजबहादूर यांनी दृष्टांतानंतर गोदावरीच्या तीरावर पंचवटीत या देवीच्या मंदिराची उभारणी केली. साक्षात श्री सप्तशृंग निवासिनी आदिमाया-आदिशक्ती भगवतीदेवी असल्याचा भाव भाविकांमध्ये आहे.

या अष्टादशभुजा देवीच्या मूर्तीचे जतन आणि संवर्धन केले आहे. हे काम बारा दिवस चालले होते. गोदावरीचा महापूर आणि नैसर्गिक आपत्ती मूर्तीसह मंदिराने अनुभवले आहेत. गोदावरीच्या प्रत्येक पुरामध्ये ही मूर्ती पाण्याखाली असते. त्यामुळे मूर्तीच्या मूळ गाभ्यापर्यंत ओलावा कायम राहात होता. (Navratrotsav 2022 idol conservation of sandvyavarchi devi idol of Sri Nashik Latest Marathi News)

मूर्तीच्या अवतीभवती असलेली आर्द्रता, धुलीकरण, पाणी आणि इतर घटकांचा थेट होणारा संपर्क व परिणाम झाला होता. दर्शनासाठी असलेली गर्दी आणि गावठाणातील प्रदूषण हेही परिणामासाठी कारणीभूत ठरले होते. वातावरणातील सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड व डाय-ऑक्साईड, व्हॅलेंटाईल ऑरगॅनिक कंपाउंड, कार्बन मोनॉक्साईड यांच्या वाढलेल्या प्रमाणामुळे मूर्तीची झीज व्हायची.

दर वर्षी वेळोवेळी मूर्तीचे जतन व संवर्धनाचे काम होत. पण नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेच्या अगोदरपर्यंत यंदा झालेल्या संवर्धनाच्या कामात कोणत्याही प्रकारचे हानिकारक व कृत्रिम पदार्थांचे लेपन न करता बारकाईने अभ्यासपूर्ण रासायनिक संवर्धनप्रक्रिया करण्यात आली आहे.

मिट्टी फाउंडेशनतर्फे संवर्धन

मूर्तीची झीज थांबविण्याच्या प्रक्रियेत कुठेही एमसील, एरल्डाइट अथवा तत्सम रासायनिक वापर केला नाही. तसेच मूर्तीची झीज होण्याची प्रक्रिया संथ होण्यासाठीचा निर्णय घेतला. त्यानुसार वेगवेगळ्या रसायनांचा वापर करून ते मूर्तीमध्ये सोडले. मूर्तीला आतून बळकटी देण्याचे काम केले आहे. संवर्धनाच्या कामात मिट्टी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा शिल्पकार-तज्ज्ञ कलासंवर्धक मयूर मोरे यांचा सहभाग राहिला.

त्यांनी मूर्ती संवर्धनाच्या कामाची माहिती दिली. ते म्हणाले, की अनेक प्राचीन धार्मिकदृष्ट्या महत्त्व असलेले मूर्ती व मंदिराचे संवर्धन होणे गरजेचे आहे. अशा प्रकारच्या मंदिरात मूर्तीबाबत कोणाला माहिती असेल अथवा संवर्धनासाठी मदत हवी असल्यास मिट्टी फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांना योग्य ती मदत केली जाईल. मूर्ती संवर्धनाच्या कामात मोरे कुटुंबीय आणि फाउंडेशनच्या टीमचा सहभाग राहिला.

Sandvyavarchi Devi Idol
नाशिक रोड रेल्वे स्थानकावर होणार Electrical Vehicle Charging Point

हातातील आयुधे

सांडव्यावरील देवी मूर्तीच्या संवर्धनाच्या कामात हातातील आयुधे मूळ मूर्तीप्रमाणे ठेवण्यात आली आहेत. अष्टादशभुजा (अठरा हात) देवीच्या हातातील आयुधांमध्ये मनीमाळ, कमळ, बाण, तलवार, वज्र, गदा, चक्र, त्रिशूळ, कुऱ्हाड, शंख, घंटा, पाश, शक्ती, दंड, ढाल, धनुष्य, पानपात्र, कमंडलू यांचा समावेश आहे.

दुर्गा सप्तशतीमधील नवदुर्गांचा नामोल्लेख

प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणी ।
तृतीयं चन्द्रघण्टेति कूष्माण्डेति चतुर्थकम् ।।
पंचमं स्कन्दमातेति षष्ठं कात्यायनीति च।
सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमम् ।।
नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गा: प्रकीर्तिता:।
उक्तान्येतानि नामानि ब्रह्मणैव महात्मना ।।

दुर्गा सप्तशती ग्रंथामधील देवीकवच स्तोत्राच्या श्‍लोकांमध्ये नवदुर्गांच्या नावांचा करण्यात आलेला हा उल्लेख आहे.

"मूर्तीचे ‘रूट कंजर्व्हेशन’ करण्यात आले. ही पूर्णपणे सुरक्षित व ‘रिव्हर्सेबल’ पद्धती आहे. या पद्धतीने मूर्तीच्या गाभ्यापर्यंत पक्केपणा आणला जातो. जेणेकरून मूर्तीच्या मूळ रचनेला कोणताही धक्का न लावता व कोणत्याही प्रकारची पृष्ठभागाची हानी न करता ही संवर्धनप्रक्रिया पूर्ण करण्यात आली. संवर्धनाच्या कामात कृत्रिम आणि नैसर्गिक रसायने वापरलेले नाहीत. सर्व प्रक्रिया सर्वांसमक्ष करण्यात आली." -मयूर मोरे, अध्यक्ष, मिट्टी फाउंडेशन

Sandvyavarchi Devi Idol
Water Conservation : जलदूत दररोज करताहेत 1 लाख 10 हजार लिटर पाण्याची बचत!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com