..यासाठी भाजप खासदार कंगनाचा निषेध करणार का? राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हाध्यक्षांचे भाजप लोकप्रतिनिधींना पत्र

kangana-bjp.jpg
kangana-bjp.jpg

नाशिक / त्र्यंबकेश्वर  : गेल्या काही दिवसांपासून कंगना राणावत या अभिनेत्रीच्या व्यक्तव्यावरून महाराष्ट्रात चांगलचं वातावरण तापलयं. मुंबईसाठी किंबहूना महाराष्ट्रासाठी तिने पाकव्याप्त काश्मीरच्या वक्तव्याचा अनेकांकडून निषेध व्यक्त करण्यात येतोय. तर काही तिच्या समर्थन करताना दिसत आहेत. यावरून राजकीय वातावरण देखील आता चांगलचं तापलयं.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचा भाजप लोकप्रतिनिधींना सवाल

"कंगना राणावतने महाराष्ट्रात राहुन महाराष्ट्राचा अपमान केला, परंतु केंद्रीय गृहमंत्र्यांनी त्यांचे समर्थन करत वाय सुरक्षा दिली. या कृत्याचा निषेध राज्यातील जनता करतेय, पण जर महाष्ट्रातील जनतेने ज्या भाजप लोकप्रतीनिंधींना निवडून दिले, त्यांनी विरोध नोंदवावा अथवा राजीनामा द्यावा असे पत्र राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलगांकडुन जिल्ह्यातील सर्व भाजप लोकप्रतिनिधींना खासदार भारती पवार, आमदार राहुल आहेर, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले यांना  ईमेलद्वारे पाठविण्यात आले आहे.

काय आहे या पत्रात?

कंगना राणावत या अभिनेत्रीला केंद्र शासनाने केंद्रीय गृहमंत्र्यांनी "व्हाय सुरक्षा" कशी दिली? महाराष्ट्राला "पाक व्याप्त काश्मीर" म्हणणाऱ्या निर्लज्ज अभिनेत्रीला केंद्रीय गृहमंत्र्यांनी वाय सुरक्षा दिली, त्यावेळेस महाराष्ट्राचे भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधित्व करणारे लोकप्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडून आले, त्यांना महाराष्ट्राचा अपमान कसा काय सहन होतो? महाराष्ट्र वरती कोणत्याही प्रकारचे संकट आल्यानंतर सर्व पक्ष एकत्र येऊन संकट परतवून लावतात. परंतु भारतीय जनता पक्षाचे हुकूमशहा अमित शहा यांना “छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले” अशा महापुरुषांचा वारसा असणाऱ्या महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी का घाबरतात? महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या अभिनेत्रीला संरक्षण देण्यापर्यंत मजल जाते तरीदेखील एकही भारतीय जनता पक्षाचा महाराष्ट्रातला नेता का दिल्लीतल्या हुकुमशाही गाजवणाऱ्या नेत्यांसमोर बोलत नाही? संबंधित अभिनेत्रीच्या चारित्र्याबद्दल आम्ही आपणास सांगण्याची आवश्यकता नाही. तरीदेखील अशा अभिनेत्रीला संरक्षण दिले जाते आणि महाराष्ट्रातले भारतीय जनता पक्षाचे नेते दिल्लीतील हुकूमशहासमोर खाली माना घालून सहन करतात. भारतीय जनता पक्ष त्या लोकप्रतिनिधींनी आपलं इमान हुकूमशहासमोर गहाण टाकून पद मिळवलीत का? महाराष्ट्राच्या जनतेने आपल्याला लोकहिताचे काम करण्याकरिता लोकशाही मार्गाने संविधानिक पदावरती पाठवला. आपल्याला जर महाराष्ट्राची अस्मिता जपता येत नसेल तर ज्या मतदारांनी आपल्याला निवडून दिले त्यांचा हा अपमान नाही का? भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी तातडीने आपले राजीनामे देऊन घटनेचा निषेध करावा. सर्वसामान्य मतदारांच्या भावना दुखण्याचे काम करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे सर्व लोकप्रतिनिधींनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी कडलग यांनी पत्रातून केली आहे.

संपादन - ज्योती देवरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com