NDVS Bank Election: व्यापारी बँक निवडणुकीत 124 अर्ज वैध, 1 अवैध; छाननी वेळी संचालकांमध्ये धक्काबुक्की | NDVS Bank Election 124 applications valid 1 invalid in commercial bank election Clashes between directors during scrutiny nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NDVS Bank Election

NDVS Bank Election: व्यापारी बँक निवडणुकीत 124 अर्ज वैध, 1 अवैध; छाननी वेळी संचालकांमध्ये धक्काबुक्की

NDVS Bank Election : ११ जूनला होणाऱ्या नाशिक रोड- देवळाली व्यापारी सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी सुमारे दोनशे आठ अर्ज दाखल झाले होते. बुधवारी (ता. १७) या अर्जाची छाननी झाली.

त्यापैकी फक्त एक अर्ज अवैध ठरला असून, बाकी १२४ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहे. नाशिक रोड- देवळाली व्यापारी बँकेच्या निवडणुकी प्रक्रियेला गेल्या १० मेस प्रारंभ झाला. (NDVS Bank Election 124 applications valid 1 invalid in commercial bank election Clashes between directors during scrutiny nashik news)

या आठ दिवसाच्या कालावधीत एकूण २०८ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. बुधवारी अर्जाची छाननी झाली असता त्यामध्ये विमुक्त जाती भटक्या जमाती या गटातून कादरी दाऊद हाजी महम्मद यांचा अर्ज अवैध ठरला.

बाकी इतर सर्व गटातील अर्ज मंजूर झाले आहे. अनेक उमेदवारांनी चार ते पाच अर्ज दाखल केल्यामुळे संख्या २०८ होती. आता एकूण १२४ अर्ज शिल्लक आहे. १ जूनपर्यंत माघारीचा कालावधी आहे.

या वेळात किती उमेदवार आपला अर्ज माघार घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. दोन पॅनलमध्ये सरळ लढत होणार असून, सत्तारूढ सहकार पॅनल विरुद्ध परिवर्तन पॅनल अशी लढत होणार आहे.

सहकार पॅनलचे नेतृत्व दत्ता गायकवाड, निवृत्ती अरिंगळे हे करत आहे तर परिवर्तन पॅनलचे नेतृत्व अशोक सातभाई, हेमंत गायकवाड, चंद्रकांत विसपुते हे करत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

आज उच्च न्यायालयात सुनावणी

उपनिबंधक निवडणूक निर्णय अधिकारी सतीश खरे पकडल्यानंतर व्यापारी बँकेच्या राजकारणाला कलाटणी मिळाल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. या संदर्भात ज्या उमेदवारांनी दोन लाख रुपये डिपॉझिट व शेअर घेतले असतील, अशा उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात यावे.

दोन वर्षआधी दोन लाख रुपये डिपॉझिट व शेअर घेतले असतील अशाच उमेदवारांचे अर्ज वैध ठरवण्यात यावे, अशा आशयाची याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली असू, तिची सुनावणी गुरुवारी (ता. १८) होण्याची शक्यता आहे.

संचालकांमध्ये धक्काबुक्की

छाननीच्या वेळी व्यापारी बँकेचे अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे आणि संचालक अशोक सातभाई यांच्यात शाब्दिक बाचाबाची होऊन त्याचे पर्यावरण धक्काबुक्कीत झाले होते. या ठिकाणी बँकेच्या सभासदांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले होते. अनेक नेते व सभासदांनी या घटनेपासून चार हात लांब थांबणे पसंत केले.