Nashik : शहरात आता नव्याने 3 अग्निशमन केंद्र | latest marathi news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Municipal Fire Department latest marathi news

Nashik : शहरात आता नव्याने 3 अग्निशमन केंद्र

नाशिक : शहराचा विस्तार वाढत असताना ज्याप्रमाणे पायाभूत सुविधा वाढत आहे. त्याचप्रमाणे अग्निशमन केंद्रांचीदेखील निकड भासत आहे. सध्या शहरात सहा अग्निशमन केंद्र अस्तित्वात आहे. त्यात आता नव्याने तीन केंद्रांची भर पडणार आहे. गांधीनगर, कॉलेज रोड व दसक येथे नवीन अग्निशमन केंद्रे प्रस्तावित असून, केंद्रे उभारले जाणार आहेत. (New 3 fire station in city Nashik latest marathi news)

शहराचे लोकसंख्या २० लाखांच्या पुढे गेली आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे पायाभूत सुविधांवर ताण निर्माण होत आहे. सुविधा पुरवण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता भासते. मात्र, महापालिकेची आर्थिक परिस्थिती नसल्याने महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर शासनाच्या निधीवर अवलंबून राहावे लागते.

त्यामुळे सिंहस्थ निधीमधून शहरात तीन नवीन अग्निशमन केंद्र उभारली जाणार आहे. शहरात सध्या शिंगाडा तलाव येथील मुख्य अग्निशमन केंद्र आहे. त्यानंतर सिडकोतील गणेश चौक, सातपूर औद्योगिक वसाहत, नाशिक रोड, के. के. वाघ महाविद्यालय येथे अग्निशमन केंद्रे आहेत. मात्र, शहराचा विस्तार होत असताना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोचण्यासाठी कालावधी लागतो. वाहतूक ठप्प असल्यास एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यास विलंब होतो.

त्यामुळे घटनास्थळी पाच ते दहा मिनिटात पोचण्यासाठी तीन नवीन केंद्रांची निर्मिती केली जाणार आहे. नाशिक रोड व द्वारकाच्या मधोमध मोठ्या प्रमाणात वस्ती झाल्याने गांधीनगर या मध्यवर्ती ठिकाणी अग्निशमन केंद्र उभारले जाणार आहे.

कॉलेज रोड व गंगापूर रोड हा भाग व्यापण्यासाठी या भागात अग्निशमन केंद्र प्रस्तावित आहे. नांदूर नाका, जेल रोड परिसरात मोठ्या प्रमाणात नागरी वसाहत वाढल्याने दसक भागात अग्निशमन केंद्र प्रस्तावित केले जाणार आहे, अशी माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी संजय बैरागी यांनी दिली.

हेही वाचा: Crime Update : अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; संशयिताला अटक

भरतीची गरज

महापालिकेच्या अग्निशमन विभागात मोठ्या प्रमाणात रिक्त जागा आहे त्यामुळे एकीकडे इमारती उभारल्या जात असल्या तरी कर्मचारी नसल्याने इमारतींचा उपयोग काय असावा, उपस्थित केला जात आहे.

महापालिकेकडे २७ अग्निशमन वाहने आहेत, तर ९० फायरमन कार्यरत आहेत. मंजूर आस्थापनेचा विचार करता २०९ जागा रिक्त आहेत. त्यामुळे इमारतीऐवजी फायरमनची आवश्यकता असल्याची बाब येथे अधोरेखित होते.

हेही वाचा: Fraud Crime : कंपनी मालकानेच केली कामगारांची कोटीची फसवणूक

Web Title: New 3 Fire Station In City Nashik Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NashiknmcFirefighters