Nashik News : अशोक शरमाळे उपनगर पोलिस ठाण्याचे नवीन अधिकारी

Ashok Sharmale
Ashok Sharmaleesakal

Nashik News : उपनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षकाला बुधवारी (ता. ३) लाचप्रकरणी अटक केल्याच्या कारणातून वरिष्ठ पोलिस निरीक्षक नीलेश माईनकर यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.

तर, नाशिक शहर आर्थिक गुन्हे शाखेतील निरीक्षक अशोक शरमाळे यांची उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. (New officer of Ashok Sharmale upanagar Police Station Nashik News )

पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सदर बदलीचे आदेश जारी केले आहेत. नीलेश माईनकर यांची गेल्या नोव्हेंबर महिन्यात सहायक पोलिस आयुक्तपदी पदोन्नती झालेली आहे. परंतु पदस्थापना नसल्याने ते उपनगर पोलिस ठाण्याची वरिष्ठ निरीक्षक म्हणून कार्यरत होते.

परंतु गेल्या काही दिवसांपासून उपनगर हद्दीमध्ये गुन्हेगारीत वाढ झाली होती. तसेच, रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या हाणामारी प्रकरणांसह काही महिन्यांपूर्वी उपनगर हद्दीतील सराफाने गळफास घेत आत्महत्या केली होती.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Ashok Sharmale
Kirtan Mahotsav : नाशिकमध्ये उद्यापासून श्री काळाराम मंदिरात साडेचारशे कीर्तनकारांचा 'हरी विठ्ठल'!

या प्रकरणातही माईनकर यांच्यावर संबंधितांनी आरोप केले होते. तर, बुधवारी (ता. ३) उपनगर पोलिस ठाण्याचा सहायक निरीक्षक सागर डगळे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ७ हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक केली होती.

या तात्कालिक कारणातून माईनकर यांची तडकाफडकी पोलिस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. तर, शहर आर्थिक गुन्हे शाखेतील पोलिस निरीक्षक अशोक शरमाळे यांच्याकडे उपनगर पोलिस ठाण्याची जबाबदारी सोपविली आहे.

शरमाळे हे गेल्या वर्षी मुंबईतून नाशिक पोलिस आयुक्तालयात रुजू झाले आहेत. मुंबई आर्थिक गुन्हे शाखेमध्ये त्यांनी काम पाहिले आहे.

Ashok Sharmale
Success Story: जिद्द, चिकाटीने ‘प्रेषित’ आर्मड पोलिस फोर्सेसमध्ये! देशसेवेचे स्‍वप्‍न केले पूर्ण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com