
नाशिक ग्रामीण पोलिस दलाच्या सुरक्षा व्यवस्थेला वाहनांचे पाठबळ
नाशिक : नाशिक जिल्हा ग्रामीण पोलिस दलास जिल्हा नियोजन समितीतून 23 चारचाकी व 80 दुचाकी वाहनांची उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यामुळे नाशिक पोलिस दलाच्या सुरक्षा व्यवस्थेला वाहनांचे पाठबळ लाभले आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले आहे.
पोलिस अधिक्षक कार्यालय नाशिक (ग्रामीण) येथे अयोजित ग्रामीण पोलिस वाहनांचे वितरण कार्यक्रमात पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते.
पालकमंत्री छगन भुजबळ यावेळी म्हणाले की, जिल्ह्यात प्रथमत: जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून उपलब्ध करून देण्यात आलेली बहुतांश वाहने ही महिला सुरक्षा निर्भया पथकांसाठी महिला अधिकारी यांना सूपूर्द करण्यात आली आहेत.
हेही वाचा: Russian Ukraine War | नाशिकची विद्यार्थीनी युक्रेनमध्ये अडकली
डायल 112 ही कार्यप्रणाली सुद्धा लवकरच कार्यान्वित होत असून, या प्रणालीत मध्यवर्ती वॉर रूमच्या नियंत्रणाखाली ही सर्व वाहने असणार आहेत. प्रत्येक गाडीचे लोकेशन वॉर रूमला या प्रणालीच्या माध्यमातून उपलब्ध होणार असून, घटनास्थळी जेथे दुर्घटना घडली असेल किंवा नागरिकांना पोलिसांची मदत हवी असेल अशा ठिकाणी विनाविलंब सिग्नलद्वारे यंत्रणेला सूचना मिळून पोलिसांची मदत वेळेत उपलब्ध होणार आहे. यामुळे महिला सुरक्षा व्यवस्थेत चोखपणे काम करता येणे शक्य होणार असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

वॉर रूमची पाहणी करताना पालकमंत्री छगन भुजबळ.

यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात चार जणांना वाहनांचे वितरण करत नवीन वाहनांना पालकमंत्री श्री. भुजबळ यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला.
महाराष्ट्र आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली (MERS) कक्षाची पालकमंत्री यांची भेट पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज पोलिस अधिक्षक कार्यालय येथील आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली (MERS) कक्षास भेट दिली. या कक्षात डायल 112 कार्यप्रणाली संगणकप्रणालीद्वारे कसे चालते याची पाहणी केली.
हेही वाचा: दुकानासमोर महिलांनी गर्दी केली म्हणून वाहनचालकावर कात्रीने वार
याप्रसंगी जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील, अपर पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे, पोलिस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर, पोलिस निरीक्षक विशेष शाखा अकबर पटेल, पोलिस निरिक्षक स्थानिक गुन्हे शाखा हेमंत पाटील, पोलिस निरीक्षक पंकज पवार, राखीव पोलिस निरीक्षक सुरेश चव्हाण, पोलिस निरीक्षक मिलिंद तेलुरे, जितेंद्र मोटर्स प्रा.ली. संचालक जितेंद्र शाह यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
Web Title: New Vehicle And Technology For Nashik District Police Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..