निफाड तालुका गारठला! ८.५ निच्चांकी तापमानाची नोंद; द्राक्ष बागायतदारांची धावपळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nifad nashik.jpg

महाराष्ट्र राज्याचा कॅलिफोर्निया समजला जाणारा नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्याचा पारा घसरल्याने तालुक्यात सर्वत्र हुडहुडी भरली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याच्या दिशेत बदल होत असल्याच्या कारणाने व मागील वर्षाच्या तुलनेत थंडीचा हंगाम लवकर सुरू झाल्याने निफाड तालुक्यात सर्वत्र गारवा जाणवू लागला आहे.

निफाड तालुका गारठला! ८.५ निच्चांकी तापमानाची नोंद; द्राक्ष बागायतदारांची धावपळ

sakal_logo
By
अरुण खंगाळ

लासलगाव (जि.नाशिक) : महाराष्ट्र राज्याचा कॅलिफोर्निया समजला जाणारा नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्याचा पारा घसरल्याने तालुक्यात सर्वत्र हुडहुडी भरली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याच्या दिशेत बदल होत असल्याच्या कारणाने व मागील वर्षाच्या तुलनेत थंडीचा हंगाम लवकर सुरू झाल्याने निफाड तालुक्यात सर्वत्र गारवा जाणवू लागला आहे.

द्राक्ष बागायतदारांची  धावपळ
गेल्या वर्षी 12 नोव्हेंबर 2019 ला 20 अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती तर 12 नोव्हेंबर 2020 ला 8.5 नीचांकी तापमानाची नोंद निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान विभागात झाली आहे. तालुक्यात सातत्याने पारा घसरत असल्याने तालुक्यातील मोठ्या प्रमाणात द्राक्षबागा असलेल्या चांदोरी, सायखेडा ,उगाव ,वनसगाव निफाड, रानवड, सावरगाव ,पिंपळगाव, कसबे सुकेने ,गोरठाण,विंचुर, शिरवाडे, कुंभारी ,पंचकेश्वर, ही गावे थंडीने गारठून गेली आहे. या थंडीचा द्राक्ष बागेला धोका पसरू नये म्हणून शेतकरी वर्गाची धावपळ सुरू झाली आहे.
मागील वर्षी आलेल्या "क्यार" चक्रीवादळामुळे थंडीचा मोसम उशिरा सुरू झाला होता मात्र या हंगामात थंडी लवकर सुरू झाले आहे.

हेही वाचा > जिल्हाधिकारी चक्क कार्यालय सोडून 'जोडप्याला' भेटतात तेव्हा..!...

...नोव्हेंबर मध्ये तालुक्यात झालेली पारा घसरण.........( अंश सेल्शीयस मध्ये)

2 नोव्हेंबर........ 18.5
4 नोव्हेंबर......... 16
5 नोव्हेंबर......... 14
6 नोव्हेंबर.......... 12
7 नोव्हेंबर........... 11.5
9 नोव्हेंबर........... 11
10नोव्हेंबर........... 10
11 नोव्हेंबर............ 9
12 नोव्हेंबर............8.5
 

loading image
go to top