NMC Budget Meeting : स्थायी समितीला सादर केलेले अंदाजपत्रक जैसे- थे! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NMC

NMC Budget Meeting : स्थायी समितीला सादर केलेले अंदाजपत्रक जैसे- थे!

नाशिक : २०२३-२४ या आर्थिक वर्षाचे दोन हजार ४७७ कोटी रुपयांचे प्रारूप अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक मंगळवारी (ता. २८) स्थायी समितीकडून महासभेला सादर केले जाणार आहे. प्रशासक असल्याने स्थायी समितीचे अंदाजपत्रक जैसे-थे मंजूर केले जाणार आहे.

आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी स्थायी समितीला प्रारूप अंदाजपत्रक सादर केले होते. स्थायी समितीने शिफारस केलेले अंदाजपत्रक आयुक्तांकडूनच महासभेला सादर केले जाणार आहे. (NMC Budget Meeting budget presented to Standing Committee as it is nashik news)

हेही वाचा : नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार

लोकप्रतिनिधींच्या कार्यकाळात स्थायी समिती, महासभा अस्तित्वात असते. आयुक्तांकडून म्हणजेच प्रशासनाकडून स्थायी समितीला अंदाजपत्रक सादर केले होते. स्थायी समिती सदस्यांच्या योजनांचा अंतर्भाव करून महासभेवर अंदाजपत्रक सादर केले जाते.

परंतु प्रशासकीय राजवट असल्याने आयुक्तांकडेच सर्वाधिकार आहे. त्यामुळे नवीन योजनांचा अंतर्भाव केला जाणार नसल्याचे समजते. प्रारूप अंदाजपत्रकात शहरातील रस्ते, उड्डाणपूल, जलवाहिन्या, मलवाहिका, परिवहन, विद्युतीकरण, उद्यान विकास, शिक्षण, वैद्यकीय सेवा, घनकचरा व्यवस्थापन आदी नागरी सुविधांसाठी आर्थिक तरतूद करण्यात आली होती.

स्मार्ट स्कूल, पर्यावरण संवर्धन, नमामि गोदा, वैद्यकीय सेवा, आयटी पार्क या महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी तरतूद करण्यात आली आहे.

टॅग्स :NashiknmcBudget