NMC Disaster Management : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचा आराखडा | NMC Disaster Management Plan of Municipal Corporation in wake of monsoon nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NMC News

NMC Disaster Management : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचा आराखडा

NMC Disaster Management : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्याबरोबरच कक्षाची स्थापना केली जाणार आहे. आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला असून, येत्या १ जूनला व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित होईल.

पावसाळ्यात वादळी पावसात झाडे, जुनी घरे, वाडे कोसळून गटारी तुंबणे, रस्त्यावर पाणी साचणे, पथदीप बंद पडणे, दूषित पाणीपुरवठा, नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतरण यासारख्या घटना घडतात. (NMC Disaster Management Plan of Municipal Corporation in wake of monsoon nashik news)

त्यामुळे राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांना पावसाळ्यात आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करून कक्ष स्थापन करण्याची जबाबदारी निश्चित केली आहे. त्यानुसार महापालिकेकडून या वर्षीदेखील आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला आहे.

आराखड्यात विभागनिहाय कामांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. आपत्ती निवारणात अग्निशमन विभागाकडे प्रमुख जबाबदारी देण्यात आली आहे. घटनास्थळी बचाव कार्यासाठी कर्मचारी नियुक्त करणे, अग्निशमन बंबासह इमर्जन्सी रेस्क्यू व्हॅन उपलब्ध करून देणे, झाडांचा अडथळा दूर करणे, पूर परिस्थितीत जीवरक्षक तसेच यंत्रे सज्ज ठेवण्याची जबाबदारी या विभागाकडे आहे.

त्याच प्रमाणे महापालिकेच्या राजीव गांधी भवनमध्ये आपत्ती निवारण कक्ष स्थापन केला जाणार असून हा कक्ष २४ तास खुला राहणार आहे. कक्षात काम करण्यासाठी तीन सत्रात अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

अशी आहे जबाबदारी

- प्रशासन - जिल्हा व राज्य आपत्ती निवारण कक्षाशी समन्वय.

- अतिक्रमण निर्मुलन- आपत्तीत मनुष्यबळ, यंत्रसामग्री उपलब्ध करून देणे.

- जनसंपर्क - स्थलांतरित नागरिकांची निवारा व्यवस्था.

- बांधकाम - नुकसान मोजणे, पाण्याचा निचरा, रस्ते, गटारी दुरुस्ती.

- पाणी पुरवठा - आपत्कालीन कक्ष- वाढत्या पाण्याची पातळी कळविणे.

- मलनिस्सारण- तुंबलेल्या भूमिगत, पावसाळी गटारी दुरुस्ती.

- घनकचरा व्यवस्थापन- रस्त्या, नदीकाठचा कचरा हटविणे.