NMC Election : महापालिका निवडणुका लांबणीवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NMC Election Latest Marathi News

NMC Election : महापालिका निवडणुका लांबणीवर

नाशिक : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात सर्वोच्च न्यायालयात होणारे सुनावणी आता पुन्हा २८ मार्चला होणार आहे. त्यामुळे महापालिकांच्या निवडणुकादेखील लांबणीवर पडणार आहे. साधारण ऑक्टोबर महिन्यात निवडणुका होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. (NMC Election postponed nashik news)

हेही वाचा : अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

मार्च २०२२ मध्ये राज्यातील १८ महापालिकांची मुदत संपुष्टात आली. त्यानंतर ओबीसी आरक्षण व प्रभाग रचनेचा वाद न्यायालयात गेल्याने निवडणुकांना स्थगिती मिळाली. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ४ ऑगस्टला राज्य शासनाने प्रभागरचना बदलण्याचा निर्णय घेतला.

२२ ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयाने जैसे ते परिस्थिती ठेवण्याचा आदेश दिला. त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी झाली नाही. २१ मार्चला सुनावणी निश्चित करण्यात आली, मात्र सॉलिसिटर जनरल तुषार मेहता सुनावणीला गैरहजर राहिल्याने सुनावणी लांबणीवर पडली आहे.

आता २८ मार्च ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. राज्यात २३ महापालिका, २०७ नगरपालिका, २५ जिल्हा परिषद व २८४ पंचायत समितीच्या निवडणुका प्रलंबित आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या तरी पावसाळ्यात निवडणुका घेता येत नाही. त्यामुळे ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

टॅग्स :NashikNmc election