आरक्षण सोडत नंतर सातपूर विभागातील सेनेसह दिग्गजांची उडाली दांडी

Womens nmc Election reservation draw
Womens nmc Election reservation drawesakal

सातपूर (जि. नाशिक) : आरक्षण सोडतीनंतर (Reservation Draw) सातपूर विभागातील सहा प्रभागात (Ward) दिनकर पाटील, विलास शिंदे, शशिकांत जाधव आदींसह माजी नगरसेवकांसाठी (Corporators) सुगीचे दिवस म्हणावे लागेल. मात्र, कालपर्यंत सहकारी नगरसेवक म्हणून मिरवणारे काही नगरसेवकांना मात्र आपल्याच मित्रांसमोर लढावे लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. (nmc election women reservation draw Nashik News)

सातपूर विभागात प्रभाग ११, १२, १३, १४, १५ व ३४ हे सहा प्रभाग समाविष्ट करण्यात आले. त्यात १८ जागा आहे. आरक्षण सोडतीनंतर सहा जागेवर अनुसूचित जाती ६ जागांवर आरक्षण पडले आहे. त्यात ४ जागेवर महिला, तर दोन जागेवर पुरुष- महिला दोन्ही उभे राहू शकता. दुसरीकडे अनुसूचित जमातीच्या दोन जागेवर आरक्षण पडले आहे. या दोन्ही जागेवर महिलाच उभे राहू शकणार असल्याने पुरुष उमेदवारांची मोठी पंचाईत झाली आहे. याचा फटका नगरसेवक योगेश शेवरे यांना बसणार असून, त्यांच्या जागेवर आता पत्नीला उमेदवारी करावी लागणार आहे. तसेच सर्वसाधारण महिला वर्गाला ४ जागेवर आरक्षण पडले आहे, तर ७ जागेवर सर्वसाधारण आरक्षण पडले आहे. या सात जागेवर महिला, पुरुष दोन्ही उभे राहू शकणार आहेत .

या दिग्गजांचा झाला सोईनुसार प्रभाग

प्रभाग ११ मध्ये विद्यमान नगरसेवक विलास शिंदे व संतोष गायकवाड हे शिवसेनेचे नगरसेवक मात्र आरक्षण पडल्याने या दोघांपैकी एकाला थांबून राहावे लागेल, अथवा समोरासमोर लढावे लागेल. तीच काहीशी अशीच परिस्थिती ३४ मध्ये निर्माण झाली आहे. या प्रभागात भागवत आरोटे व मधुकर जाधव यांच्या बाबतीत झाली आहे. आरक्षणामुळे या दोन्ही प्रभागातील आपल्याच पक्षातील उमेदवारांसमोर लढण्याची वेळ आली आहे.

Womens nmc Election reservation draw
टेबलावर दिसताय अधिकारी-कर्मचारी; कारवाईच्या बडग्यामुळे कामांचा निपटारा

प्रभाग १२ हा दिनकर पाटील यांच्या यासाठी सोईचा झाला आहे. मागील निवडणुकीत उपरा व बाहेरील वादामुळे पल्लवी पाटील व माधुरी बोलकर यांचा पराभव करण्यासाठी स्वपक्षीयानींच प्रयत्न केल्याच पाहायला मिळाले होते. नशीब बलवत्तर म्हणून निसटता विजय पदरात पडला होता. आता पुन्हा संधी निर्माण झाली आहे. प्रभाग १४ मध्ये नव्या आरक्षणानुसार विद्यमान नगरसेवक सलीम शेख, शशिकांत जाधव, पल्लवी पाटील, स्वप्नील पाटील, सीमा निगळ, दीक्षा लोढे, गोकुळ निगळ आदींची लढत पाहायला मिळणार आहे. प्रभाग १५ मध्ये मात्र माजी नगरसेवक प्रकाश लोढे, सून दीक्षा लोढे, अरुण काळे, सुजाता काळे, ज्योती शिंदे आदींना संधी निर्माण झाली आहे.

Womens nmc Election reservation draw
Nashik : चित्रकलाच बनली नवनिर्मितीचे साधन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com